You are currently viewing भाजपा सोशल मीडियाकडून सिंधुदुर्गात चक्क काँग्रेसचे कौतुक? राजकीय क्षेत्रात खळबळ

भाजपा सोशल मीडियाकडून सिंधुदुर्गात चक्क काँग्रेसचे कौतुक? राजकीय क्षेत्रात खळबळ

महावितरणकडून लोकांच्या वीज मीटर कापणीची मोहीम जोरदार उघडण्यात आली आहे. लोक अक्षरश: हैराण झाले आहेत. काल काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असता भाऊबीजेपर्यत कोणाचीही लाईट कापली जाणार नसल्याचे मान्य करण्यात आले. आजपासून कोणाचीही वीज कापली गेल्यास अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासू असा इशारा काँग्रेसचे अभय शिरसाट यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा सोशल मीडियाचे सिंधुदुर्ग अध्यक्ष अविनाश पराडकर यांनी अभय शिरसाट व काँग्रेस पक्षाच्या भूमिकेचे अभिनंदन केले आहे. भाजप या प्रश्नावर जनतेसाठी खऱ्या अर्थाने उतरलाच नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे. भाजपा सोशल मीडियाच्या सर्व टीमकडून हा लेख प्रसारित केला जात आहे. एकूणच सिंधुदुर्ग भाजपमध्ये आलबेल नसल्याचे जाणवत आहे. एरवी काँग्रेसवर घणाघाती टीका करणाऱ्या या भाजपच्या अधिकृत सोशल मीडिया टीमच्या काँग्रेस कौतुकामुळे राजकीय क्षेत्रात वेगळ्या चर्चेला उत आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − 2 =