You are currently viewing तिथवली येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेचा सोमवारी भव्य उद्घाटन सोहळा!

तिथवली येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेचा सोमवारी भव्य उद्घाटन सोहळा!

तिथवली येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेचा सोमवारी भव्य उद्घाटन सोहळा!

२३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजन; शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व शिवसैनिकांची उपस्थिती लाभणार

तिथवली : प्रतिनिधी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तिथवली शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा सोमवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यानिमित्त शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक तसेच मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तिथवली येथे शाखेची स्थापना करण्यात येत असून, या माध्यमातून परिसरातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेला अधिक बळ मिळणार आहे.
या आनंददायी व ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शिवसैनिकांनी सहकुटुंब व मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा जपत संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून तिथवली शाखाप्रमुख चिंतामण (नाना) जैतापकर, मधुकर इरवळकर आणि प्रमोद हरयाण यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा