You are currently viewing उद्या वसोली रवळनाथ मंदिर वर्धापन दिन

उद्या वसोली रवळनाथ मंदिर वर्धापन दिन

वासोली :

दुकानवाड वसोली येथील देव रवळनाथ मंदिराचा तिसरा वर्धापन दिन बुधवार 25 मे रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

बुधवारी सकाळी 10 वा. रवळनाथ मंदिरात अभिषेक, 11 वा. दिर्बादेवीच्या मंदिरात होम-हवन, आरती, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी 7 वा. दत्तगुरु भजन मंडळ. कासार्डे चे बुवा प्रकाश पारकर यांचे भजन रात्री 8 वा. गिरोबा भजन मंडळ, बिबवणेचे बुवा कुणाल शिरोडकर यांचे भजन, 9 वा.शिवापूर भजन मंडळ, 10 वा. वसोली ग्रामस्थ मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव रवळनाथ पंचायतन, वसोलीतर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा