You are currently viewing फोंडाघाटच्या शंभर वर्षे जुन्या विठ्ठल मंदिरात अजित नाडकर्णी यांनी घेतले दर्शन!

फोंडाघाटच्या शंभर वर्षे जुन्या विठ्ठल मंदिरात अजित नाडकर्णी यांनी घेतले दर्शन!

फोंडाघाटच्या शंभर वर्षे जुन्या विठ्ठल मंदिरात अजित नाडकर्णी यांनी घेतले दर्शन!

आषाढी, कार्तिकी व माघी एकादशीला मंदिरात धार्मिक कार्यक्रम; पावणादेवी मंदिरातही सप्ताहाला भाविकांची गर्दी

फोंडाघाट : प्रतिनिधी
फोंडाघाट येथील सुमारे १०० वर्षांपूर्वीचे श्री विठ्ठल मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात आषाढी, कार्तिकी आणि माघी एकादशीला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शितोळे कुटुंबीयांचे हे मंदिर असून, पंढरपूरला जाणे शक्य नसलेल्या भाविकांसाठी येथेच विठ्ठल दर्शनाची आणि भक्तीची संधी उपलब्ध होते.
आज या मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. मंदिरातील प्रसन्न वातावरण आणि भक्तिमय परिसर पाहून मनाला खूप समाधान व प्रसन्नता लाभली, अशी भावना अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केली.
फोंडाघाट येथील पावणादेवी मंदिरही भाविकांचे आणखी एक महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरातही सप्ताहाचे आयोजन केले जाते. यावेळी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.
विठ्ठल मंदिर आणि पावणादेवी मंदिर ही दोन्ही मंदिरे फोंडाघाट परिसरातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेची ओळख असून, भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र बनली आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा