आठही तालुक्यांतील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी; विविध भाजपा कार्यालयांना देणार भेट
कुडाळ :
भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद जठार यांची विधान परिषदेत आमदार म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर ते प्रथमच ७ व ८ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्यात ते जिल्ह्यातील आठही तालुक्यांना भेट देत स्थानिक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांशी संवाद साधणार आहेत.
या दौऱ्याची सुरुवात बुधवार, दि. ७ मे रोजी सकाळी १० वाजता दोडामार्ग भाजपा कार्यालय येथून होणार आहे. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता सावंतवाडी भाजपा कार्यालय, दुपारी १ वाजता वेंगुर्ला भाजपा कार्यालय, सायंकाळी ४ वाजता कुडाळ भाजपा कार्यालय आणि सायंकाळी ६ वाजता मालवण भाजपा कार्यालय येथे ते भेट देणार आहेत.
त्यानंतर गुरुवार, दि. ८ मे रोजी सकाळी १०.३० वाजता देवगड भाजपा कार्यालय, सकाळी ११.३० वाजता पडेल भाजपा कार्यालय, दुपारी १ वाजता वैभववाडी भाजपा कार्यालय, सायंकाळी ३.३० वाजता कणकवली ग्रामीण भाजपा कार्यालय तसेच सायंकाळी ५ वाजता कणकवली शहर भाजपा कार्यालय येथे ते भेटी देणार आहेत. दौऱ्याचा समारोप सायंकाळी ६.३० वाजता तळेरे गावच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमाने होणार आहे.
