You are currently viewing बाळकृष्ण गोरे यांना रत्नमोती कलागौरव पुरस्कार..!

बाळकृष्ण गोरे यांना रत्नमोती कलागौरव पुरस्कार..!

सावंतवाडी

बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळाचे मालक बाळकृष्ण ऊर्फ दिनेश गोरे यांना इचलकरंजी येथील ए. जे. वेलफेअर फाऊंडेशनच्या राष्ट्रीय रत्नमोती दशावतार कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या संस्थेच्या सामाजिक कला साहित्य संमेलनात सुप्रसिद्ध जेष्ठ सिनेअभिनेत अरूण नलावडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

यावेळी केज नगरपंचायीचे गटनेते हरूणभाई इनामदार पुण्याचे उद्योजक निसार सुतार इचलकरंजी बार असोसिएशन चे सक्रेटरी सचिन माने जगदाळे प्लाॅलेटेनिक काॅलेजचे संस्थापक धनाजीराव जगदाळे मोहळ, नगरपरिषद अध्यक्षा शाहीन शेख, उद्योजक कोशिक गायकवाड, नवी मुंबईचे विभागीय अधिकारी सुरेश उमप आदी मान्यवर उपस्थित होते.

दशावतार कलेत अल्पावधीतच त्यांनी ठसा उमटवून लाखो रसिकांचे चाहते बनले आहे. दशावतार कलेतील दोन दशकातील त्याचे योगदान लक्षात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यापूर्वी त्यांना लोककला क्षेत्रातील विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार प्राप्त झाल्याबदल विविध क्षेत्रातील अभिनंदन होतं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा