You are currently viewing सेवा पंधरवड्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा

सेवा पंधरवड्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा

– अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे   

सिंधुदुर्गनगरी

नागरिकांना जलद सेवा देण्याकरिता महाराष्ट्र शासनातर्फे दि. 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आलेला आहे. कालावधीत नागरिकांनी आपली शासकीय कार्यालतील कामे प्राधान्याने पूर्ण करुन घ्यावीत. शासकीय कार्यालयामध्ये कामाची पूर्तता करण्यासाठी माहिती फलक लावण्यात आले आहेत. तथापि, काही विभागामार्फत कार्यशाळांचेही आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी केले.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सिंधुदुर्ग यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथील सभागृहामध्ये सेवा पंधरवड्याचे औचित्य साधून 16 सप्टेंबर रोजी जात प्रमाणपत्र निर्गमित करताना घ्यावयाची दक्षता व त्यातील महत्वाच्या बाबी यावर एक दिवसाची कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेस जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते, सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, कणकवली प्रांताधिकारी  वैशाली राजमाने, कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे, सर्व तहसिलदार तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातील विधी अधिकारी डी. एस. पाटील, व्यवस्थापक संतोष कदम व विनय मोरजे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

या कार्यशाळेमध्ये जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त प्रमोद जाधव यांनी जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याची कार्यपध्दती, जात प्रमाणपत्र निर्गमित करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.संगणकीय सादरीकरणातून मार्गदर्शन केले. यावेळी अन्य मान्यवरांनी आपले मत व्यक्त करताना अनुभव सांगताना जनतेला त्वरित सेवा देण्यासाठी मार्गदर्शन असणे आवश्यक असून, त्यासाठी प्रत्येक विषयांवर कार्यशाळांचे आयोजन केल्यास अधिक चांगली सेवा देण्यासाठी त्याचा निश्चितच उपयोग होईल, असे सर्वागिण मत व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 11 =