You are currently viewing अपंग कल्याणासाठी योजना आणि अधिकारी अरेरेवी
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

अपंग कल्याणासाठी योजना आणि अधिकारी अरेरेवी

लेख सादर: अहमद नबिलाल मुंडे

‌महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम २९६१ मधील अनुसूचि _१ मध्ये नमूद केल्यानुसार जिल्हा परिषदेच्या स्व उत्पादनातून जिल्हा परिषदेने तर अनुसूची _२ मध्ये नमूद केल्यानुसार पंचायत समिती स्व उत्पादनातून पंचायत समिती वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांवर खर्च करावयाचा आहे. सामाजिक न्याय विभाग संदर्भातील दिनांक २८/ एप्रिल २०१७ चे अरधशासकीय पत्रानुसार केंद्र शासनाच्या निसमरथ अपंग व्यक्ती अधिनियम २०१६ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करणेबाबत कळविले आहे. सदर अधिनियमातील नियम ३७ अन्वये दिवयांगांना. विविध कल्याणकारी योजना मध्ये ५/टक्के निधी व आरक्षण ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच त्यामध्ये दिव्यांग महिलांना प्राधान्य राहील. जिल्हा परिषदेच्या स्व उत्पादनातून व सामुहिक स्वरुपाच्या विविध योजना घेण्यात येतात. मात्र. या संदर्भात जिल्हा परिषदानी त्यांच्या सव उत्पादनातून केलेल्या खर्चाचा आढावा घेतला असता वैयक्तिक लाभाच्या योजनांवर प्रमाणापेक्षा जास्त खर्च झाल्याचे आढळून आले आहे. वास्तविक त्या त्या प्रवर्गातील व्यक्तींना त्यांच्या त्या प्रवर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यावर खर्च होणे आवश्यक आहे. याप्रकरणी शासनस्तरावरून योजना निश्चित करून देण्यात येत आहेत. तसेच सदर निधी हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्व उत्पादनातून खर्च करण्यात येत असल्याने कोणकोणत्या योजनांवर निधी खर्च करावा. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार असणे आवश्यक आहे. सदर खर्चाबाबत काही मार्गदर्शक सूचना निर्गमित करून खालील प्रमाणे सर्वसमावेशक आदेश देण्यात आले आहेत
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ चे कलम २६१ पोट कलम (१) खालील अधिकाराचा वापर करून या निर्णयाद्वारे शासन असे आदेश देत आहे की शासनाने खालीलप्रमाणे विहित केलेल्या योजना व्यतिरिक्त जिल्हा परिषद. पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या सर्व अधिकार संबंधित जिल्हा परिषद/ पंचायत समिती. / ग्रामपंचायत यांना देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या निसमरथ ( अपंग ) व्यक्ती अधिनियम २०१६ नुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या स्व उत्पादनातून ५/ ठिकाणी टक्के निधी राखीव ठेवणे आवश्यक आहे त्यातून अपंग लोकांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येणार
*. अपंग पुनर्वसन केंद्र. थेरपी सेंटर सुरू करणे. यामध्ये. भौतिक उपचार तज्ञ व्यवसाय उपचार. तज्ञ स्पीच. थेरपीषट. बालविकास मानसशास्त्र व वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश असावा
* सार्वजनिक इमारती व ठिकाणी अपंगांसाठी अडथळा विरहित वातावरण निर्माण करणे. जुन्या इमारतींचे अॅकसेस आॅडीट करून जुन्या इमारतींची मध्ये सुविधा निर्माण करणे. यामध्ये रॅपस रेलिंग टाॅयलेट बाथरूम पाण्याची सोय लिफटस. लोकोशन बोर्ड इत्यादी सुविधा उपलब्ध करून देणे
*अपंग महिला बचत गटांना भरिव अर्थसाह्य. अनुदान. यामध्ये अपंग महिला बरोबर मतिमंद पालक असणार्या महिलाचा देखील समावेश असावा
* अपंगांना आर्थिक मदत स्वयंसहाय्यता गटांना अनुदान देणे
* अपंग उधोजकता व कौशल्य विकास प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करणे
* अपंग व्यक्ती करीता क्रीडा प्रबोधिनी स्थापना करणे व क्रीडा संचालनालय मान्यतेने क्रीडा स्पर्धा आयोजित करणे *करमणूक केंद्र. बाग बगिचे. यामध्ये अपंग वयकतिसाठी विशेष. सुविधा उपलब्ध करून देणे
* सुलभ स्वच्छता गृह. व स्नान गृह. अपंग वयकतिसाठी. योग्य फेरबदल करणे अथवा अपंगांसाठी सोयीस्कर सुलभ शौचालय व स्नानगृह बांधने
*स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रुग्णालयांमध्ये तसेच जिल्हा परिषद अंतर्गत येणारे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्णबधिर साठी. बेरा. चिकित्सक निर्माण करणे.
* सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रुग्णालयांमध्ये तसेच जिल्हा परिषद अंतर्गत येणारे प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत अपंगत्व प्रतिबधाकरीता रुबेला लसीकरण करणे व जनजागृती करणे.
*. मतिमंदासाठी. कायमस्वरूपी औषधोपचाराची गरज आहे त्यांना मोफत औषधे पुरविणे
* कुष्ठरोगी साठी औषधे / ड्रेसिंग तसेच सहाय्यभूत साधनें व सर्जरी अपलायंसेस पुरविणे
* सर्व प्रवर्गातील अतितिवर अपंगत्व असलेल्या वयकतिसाठी. तात्पुरत्या अथवा कायम स्वरुपाचा निवारा गृहाला सहाय्यक अनुदान देणे
* अपंगत्व प्रतिबंधात्मक लवकर निदान व उपचार दृष्टीने अंगणवाडी शिक्षिका व सेवकास प्रशिक्षण देणे
* लवकर निदान त्वरित उपचार दृष्टीने अपंगांच्या पुर्व प्राथमिक शिक्षणाची सुविधा पुरविणाऱ्या संस्थाना अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे
* अपंग व्यक्तींना समुपदेशन तसेच सललमसलत करणार्या केंद्रांना सहाय्यक अनुदान देणे
* मतिमंद मुलांच्या पालकांना संघाना / संघटनांना सहाय्यक अनुदान देणे
* मतिमंदासाठी तात्पुरते केअर सेंटर. / डे केअर सेंटर यांची स्थापना करणे
* अपंगांसाठी रोजगार व स्वयंरोजगार मेळावे आयोजित करणे
* अपंग मुले तसेच व्यक्तिला कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी कला अॅकेडमी सुरू करणे
* अपंगत्व प्रतिबंधात्मक पुनर्वसन व सोयी सुविधांबाबत प्रचार प्रसार प्रसिध्दी व जनजागृती करणे
* सार्वजनिक स्वच्छता. शाळांमध्ये मुलींसाठी शौचालय. शाळांमध्ये अपंगांसाठी विशेष शौचालये व रॅमपस इ. अत्यावश्यक बाबींना प्राधान्य देण्यात यावे
* १ ते. ५ ‌. वर्ष वयोगटातील मुकबधीर मुलांवर उपाचारासाठी. खर्च करण्यात यावा जेणेकरून त्यांचे अपंगत्व दूर होण्यास मदत होवू शकते
* अपंगत्व घालविण्यासाठी शिबीर आयोजित करणे पुनर्वसन करणे. ई पी सी. केंद्रामध्ये विशेष तज्ञ घेणे या उपाययोजना करणे गरजेचे आहे
* पॅरा. आॅलिमपिक मध्ये भाग घेण्याकरिता दिवयांगाना विशेष सोयी सुविधा निर्माण करून देण्यात याव्यात
# वैयक्तिक लाभाच्या योजना #
* अपंग व्यक्तिंना सहाय्यभूत साधनें व तंत्रज्ञान याकरिता अर्थसहाय्य देणे
* अंध व्यक्ती साठी. मोबाईल. लॅपटॉप संगणक बेल. नोट वेअर. ब्रेल. लेखन. साहित्य ब्रेल टाईपरायटर. टाकिंग टाईपरायटर. लारज प्रिंट बुक. अलपदृषटि मात करण्यासाठी इत्यादी सहाय्यभूत साधनें
* कर्णबधिर व्यक्तिसाठी. विविध प्रकारच्यी वैयक्तिक श्रवणयंत्र. शैक्षणिक संच. संवेदन उपकरणे. संगणकासाठी सहाय्यक अनुदान
* अस्थिव्यंग लोकांसाठी. कॅलिपरस. व्हिलचेअर. तीनचाकी सायकल. स्वयंचलित तीन चाकी सायकल. कुबड्या. कृत्रीम अवयव. प्रोसथोटिक अॅणड डिवहायसेस. वाॅकर सरजिकल फुटवेअर. सपलींग. मोबालिटि. एड्स. कमोड. चेअरस. कमोड सटुल सपायनल अॅणड नील वाॅकी ब्रेस. डिवहायसेस फाॅर डेली लिव्हिंग इत्यादी
* मतिमंद लोकांसाठी. मतिमंदासाठी शैक्षणिक साहित्य. बुध्दीमत्ता चाचणी संच. सहायकभूत उपकरणे व साधने तसेच तज्ञाने शिफारस केलेली अन्य सहायक साधनें
* बहुविकलांग लोकांसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ञाने शिफारस केलेली सुयोग्य सहाय्य भूत साधनें व उपकरणे. सी पी चेअर. स्वयंचलित सायकल व खुर्ची. संगणक वापरण्यासाठी सहाय्यक उपकरणे
* कुष्ठरोगी मुक्त अपंग लोकांसाठी कुष्ठरोग मुक्त अपंगांसाठी कृत्रिम अवयव व साधनें. फूटवेअर. सर्जिकल अपलायमेंट मोबालिटि एड इत्यादी
* अपंग लोकांसाठी स्वयंरोजगार अर्थसहाय्य. पिठ गिरण. शिलाई मशीन. मिर्ची कांडप केंद्र. फूड प्रोसेसर युनिट. झेराकस मशीन
* अपंग लोकांसाठी स्वयंरोजगारासाठी गाळे घेण्याकरिता अर्थ सहाय्य
* अपंग विना अट घरकुल योजना
* घरकुल योजनांमध्ये अपंग कृती आराखडा प्रमाणे अपंगांना विशेष सुविधा निर्माण करण्यात आल्या नाहीत. अशा. प्रधान मंत्री आवास योजना. ग्रामिण व अन्य राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत अपंगांसाठी घरामध्ये आवश्यक मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कमाल २०/००० इतकं प्रति लाभार्थी खर्च सदर निधीमधून करण्यात यावा
* कर्णबधिर अपंग लोकांसाठी काॅकलीया इंमलाट करण्यासाठी अर्थसहाय्य
* अपंग व्यक्तींना व्यवसाय प्रशिक्षणासाठी संगणक प्रशिक्षण घेण्यासाठी वैयक्तिक अनुदान
* अपंग व्यक्तींचे राहणीमान उंचावण्यासाठी. सोलर. कंदील. सौरबंब. सौर चूल. बायोगॅस प्लांट. इत्यादी घरगुती गरजांसाठी अर्थ सहाय्य
* अपंग व्यक्तींना मालमत्ता करात कुटुंब प्रमुखांची अट न घालता ५०/ टक्के सवलत
* अपंग व्यक्तींना विवाहासाठी प्रोत्साहन अनुदान
* अपंग शेतकरयांना उत्पन्नाच्या दाखल्याची अट न लावता शेती विषयक औजारे. मोटार पंप. विहीर खोदणे. गाळ काढणे. पाईप लाईन करणे. मळणी यंत्र. ठिबक सिंचन. बी बियाणे. यासाठी अर्थ सहाय्य
* अपंग शेतकरयांना शेतीपूरक व्यवसाय शेळीपालन कुक्कुटपालन वराह पालन मत्स्य व दुग्ध व्यवसाय यासाठी अनुदान
*अपंग शेतकरयांना फळबाग अनुदान
* मतिमंद अपंग व्यक्तींना निरामय योजनेअंतर्गत अर्थ सहाय्य हप्ते
*अपंग विद्यार्थ्यांना गणवेश तसेच विशेष शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे
* अपंग विद्यार्थ्यांना सर्व समावेशक शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या मदतनीस यांना मदतनीस भत्ते
* उच्च व तंत्रशिक्षण शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती
*केंद्र शासनाच्या लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षा पूर्व तयारी शासकीय स्पर्धा परीक्षा केंद्रावर प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना शुल्काची रक्कम देणें
* निराधार निरश्रीत व अतितीव्र अपंग व्यक्तींना विनाअट निर्वाह भत्ता
* अपंग व्यक्तींना विधुत जोड. नळकनेकसन. झोपडी दुरुस्ती. विना अट अनुदान
* अपंग महिलांसाठी सक्षमीकरण योजनांना अर्थसहाय्य
* सामाजिक अत्याचाराला बळी पडलेल्या पिडित अपंग महीलांना त्याचे मनोधैर्य वाढविण्यासाठी अर्थ सहाय्य
* अपंग व्यक्तींना दूरवर आजारांवर वैद्यकीय उपचारासाठी अर्थ सहाय्य. कॅन्सर एडस. क्षयरोग. मेंदू विकार. ह्रदय शस्त्रक्रिया
* व्यंग सुधार शस्त्रक्रिया अर्थ सहाय्य
* अंध विद्यार्थ्यांना वाचन लेखणसाठी लेखनिक अर्थ सहाय्य
* कर्णबधिर साठी दुभाषकाची व्यवस्था करणे
* शाळाबाह्य अपंगांना रात्र शाळा मध्ये शिक्षण देणे
* अपंग पालकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य
* अतितीव्र अपंगांच्या पालकांना अर्थसहाय्य
* अपंग महिलांसाठी सुरक्षितता म्हणून हेल्पलाईन तयार करणे
* अपंग बेरोजगारांच्या सहकारी संस्थांना अर्थसहाय्य
* भिक्षेकरी अपंगांना भिक मागणयापासून परावृत्त करण्यासाठी अर्थसहाय्य
* अपंग विद्यार्थ्यां व अपंग खेळाडू यांना अर्थ सहाय्य
* अपंग प्रमाणपत्र वितरण करण्याकरिता विशेष मोहिम व शिबिर आयोजित
* ग्रामपंचायत मार्फत बांधण्यात येणा-या व्यापारी गाळयामधये अपंग व्यक्तींना ५/ टक्के आरक्षण ठेवण्याची कारवाई
जिल्हा परिषद व पंचायत समिती त्यांच्या स्व उत्पादनातून घेण्यात येणार्या योजनांवरील निधी त्याच वित्तीय वर्षी खर्ची पडेल या दृष्टीने कल्याणकारी योजना आखून लाभार्थ्यांचे अर्ज स्विकारताना ते मुळातच परिपूर्ण असावेत यांची दक्षता घेण्यात यावी. यामध्ये कार्यान्वित करण्यात येणारे योजनांची अंमलबजावणी सत्वर होऊन अखर्चित राहणार नाही व सदर रक्कमेचा अनुषेशही राहणार नाही अशा योजना वर्षाच्या सुरवातीला आखण्यात याव्यात हा कार्यक्रम प्रभावीपणे अंमलबजावणी येण्यासाठी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मासिक कृती कार्यक्रम तयार करून दर महिन्याला आढावा घ्यावा. तसेच संबंधित विभागीय आयुक्तांकडे सुध्दा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मासिक बैठकांमध्ये आढावा घ्यावा. या प्रकरणी विहित पध्दतीचा अवलंब करून विहित अटी व शर्ती अधिन राहून सदर आदेशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करणे बंधनकारक राहील जर कार्यवाही होत नाही असे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × four =