You are currently viewing स्वागत

स्वागत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री अंजली दीक्षित लिखित अप्रतिम लेख*

*स्वागत*

“अहो लवकर या ना?”
“हो ग राणी, हा गेलो नि हा आलोच.”
“कालही असंच म्हणाला होतात तुम्ही.”
“ठीकै मग, आज दांडीच मारतो ऑफिसला, चल फिरायला जाऊ मस्तपैकी.”
“लगेच इतकं नै कै, लवकर या, वाट बघते.”

आणि अपेक्षापेक्षा तो खरच लवकर येतो, बेल वाजायच्या आधीच दार उघडून प्रसन्न सुगंधाची झुळूक अंगावर येते. निशिगंधाची ताजी टवटवीत फुलं समोरच्या टी पॉयवरील काचेच्या फुलदाणीतून मंद मंद स्मितहास्य उधळीत गुलू गुलू् बोलत असतात. सुंदरशी आकाशी रंगाची साडी नेसून ती… फुलांपेक्षाही फ्रेश… जशी की आत्ताच अंघोळ करून आली असावी इतकी फ्रेश… त्याच्या स्वागताला आतुर झालेली… तो विसरूनच जातो ऑफिस, कटकटी, धूळ, धूर, गर्दी, चेंगराचेंगरी, बस मधले घामाचे वास… त्याचं जग क्षणात बदलून जातं. प्रसन्नतेचं तेज सगळ्या घरभर खेळत राहतं.

हते उबदार घरटं, त्याचं आणि तिचं प्रेम, आपुलकी काळजी क्षणाक्षणाला टिपत राहतं. घरट्याची त्यांना आणि त्यांची घरट्याला साथ मिळत राहते.

त्याच सोसायटीतले दुसरें घरटे. दोघेही चिमणा चिमणी प्रेमविवाह करून लग्न बंधनात अडकलेले. लग्नानंतरची तीन चार वर्ष खूप आनंदात, प्रेमात, गेलेली असतात. एक दिवस घरी येता येता त्याला झालेल्या एक्सीडेंटचं निमित्त आणि वाट्याला येतो गुडघ्यातून कापला गेलेला त्याचा एक पाय. सगळ्या संसाराचं चक्रच थांबून जातं की काय अशा परिस्थितीत तिने त्याला दिलेली खंबीर साथ. त्याची नोकरी सुटल्यामुळे आर्थिक गणितं सर्वस्वी तिच्या पगारावर अवलंबून. त्याची चिडचिड व्हायची पण तिने विलक्षण हिकमतीने त्याच्या मनाला सकारात्मक राहण्यासाठी केलेले समर्पण खरंच काबिले तारीफ होते.

मार्च एंड ची काम चालू असल्यामुळे असाच तिला ऑफिस मधून घरी यायला जास्तच उशीर होतो, जवळजवळ रात्रीचे नऊ वाजून जातात. घरी येताना ती दोन दिवस लागणारी भाजी फळ आणि थोडं सामान वगैरे घेऊन येते पण सोबत टेन्शन पण… आता तो किती चिडला असेल, काय काय बोलेल याचे. रात्रीच्या स्वयंपाकाचे टेन्शन नव्हतेच कारण आज काल त्यांनं थोडे थोडे पदार्थ युट्युब वर बघून शिकायला सुरुवात केली होती.

दारावरची बेल वाजते आणि तो हसतमुखाने तिचे स्वागत करतो. आत मध्ये फुग्यांनी सजवलेल्या खोलीत अतिशय सुवासिक रूम फ्रेशनाचा सुगंध भरून राहिलेला असतो फक्त इन्स्ट्रुमेंटल म्युझिकचे संथ सूर वातावरण आणखीनच रोमँटिक बनवत असतात. टेबल क्लाॅथ बदललेला दिसत असतो. त्यावर डिनरसाठी केलेले आलू पनीर, दही बुंदी, जिरा राईस यांचा संमिश्र सुगंध मनाला भुरळ घालत असतो. ती खरंतर मंत्रमुग्ध होऊन बघतच राहते इतक्यात तो तिच्या हातात लग्नाच्या वाढदिवसाचे खूप सुंदर सरप्राईज गिफ्ट देऊन तिच्या चेहऱ्यावरचे झरझर बदलत जाणारे भाव पाहण्यात रमून जातो. क्षणात आभाळ भरून यावं आणि टप टप करून मोठाले थेंब आकाशातून ओघळावेत तसे तिच्या डोळ्यात जमा झालेले आनंदाचे अश्रू तो हलकेच टिपत राहतो.

त्याच सोसायटीतलं तिसरं घर. त्याची शिफ्ट वाली नोकरी, या आठवड्यात सकाळची शिफ्ट तर दुस-या आठवड्यात दुपारची आणि तिसऱ्या आठवड्यात रात्रीची शिफ्ट.त्याला या नोकरीची सवय व्हायला सुरवातीला अवघड गेलं पण पुन्हा पुन्हा अंगवळणी पडलं. रात्रीची शिफ्ट करून घरी आल्यावर दिवसा उजेडी झोपायचं तेही शेजार पाजारच्या गोंगाटात हे त्याच्यासाठी नवे राहिले नाही. दर आठवड्याला नवीन शिफ्ट प्रमाणे बॉडी क्लॉक बदलायची मनाप्रमाणे शरीरालाही सवय होत गेली त्रास होत होता पण इलाज नव्हता.
घरी परतत असताना रोज याच विचारांनी मनावर मळभ दाटून येत होतं की, आज काल नोकऱ्या मिळतात कुठे सहज? त्यातच या कंपन्या नोकर कपातीची टांगती तलवार डोक्यावर ठेवतात त्यामुळे झक मारत टिकवावी लागते मिळालेली नोकरी. त्यातून आपलं शिक्षण, पात्रता, कौशल्य यांचा काहीही त्या कामाशी संबंध असो वा नसो. लोकसंख्याच इतकी वाढली आहे की हा नाही तर दुसरा तयारच असतो आपली जागा घ्यायला… सगळा वैताग नुसता.
पावसामुळे झालेल्या चिखलाची घाण तुडवत गर्दी, गोंगाट, कर्कश्य हॉर्न ,फेरीवाल्यांचा आरडाओरडा या सगळ्यातच थंडगार वाऱ्याची झुळूक येऊन अंगभर रोमांच फुलावेत आणि मन त्या शीतलतेत न्हाऊन जावं असं काहीसं घडलं ते लग्न झाल्यावर. रखरखीत वाळवंटातून खडखड करत निघालेल्या गाडीला अचानक हिरवळीचं स्टेशन लागावं तसं काहीसं. वर्षभर तरी या स्टेशनच्या आसपासच गाडी घुटमळत राहिली. पण पुढे पुढे ते हिरवंगार स्टेशन आपली हिरवाई गमवू लागलं आणि जेव्हा ते सुटलं ते कायमचंच. तिला त्याच्या शिफ्टच्या नोकरी प्रमाणे स्वतःला बदलणं खूपच कटकटीचे आणि जिकरीचे वाटू लागले. रात्री एक वाजता ऑफिस सुटल्यावर घरी यायला दोन वाजायचे. सुरवातीला ती त्याच्यासाठी जेवायला थांबायची. नंतर नंतर नाखुशीने का होईना ती उठून अन्नं गरम करून त्याला जेवायला वाढू लागली. काहीतरी बोलणं गप्पा व्हायच्या. पुढे पुढे तिला झोपच सुधारायची नाही. तास तासभर बेल वाजवूनही दार उघडले जायचे नाही आणि जेव्हा उघडायचे तेव्हा झोपेतून उठलेल्या, अस्ताव्यस्त केस आणि चुरगळलेल्या कपड्यात तिला जांभया देताना बघणं आणि सर्वात कहर म्हणजे चेहऱ्यावरच्या कमालीच्या त्रासिक भावाने केलेले स्वागत त्याला आतल्या आत तोडायचे. दार उघडून ती तिची झोप पूर्ण करायला बडबड करत निघून जायची आणि हा आपला मित्र टेबलवर झाकून ठेवलेलं थंडगार अन्न पुढ्यात ओढून स्वतःच्याच नशिबाला तडफडत बोल लावत अन्न चिवडत बसायचा. आपल्या भिक्कार आयुष्याला शिव्या घालतच त्याची उरलेली रात्र काळी ठिक्कर पडून जायची.

प्रत्येक घराच्या प्रत्येक बंद दारा मागे अशी खूप वेगवेगळी कलंदर आयुष्यं नांदत असतात. प्रत्येक दार उघडून बघण्याची गरज तर नाहीच पण गरज आहे ती आपल्याच घराकडे तटस्थपणे पाहण्याची. व्यक्ती कोणीही असो दार उघडल्यावर आपलं घर आपलं स्वागत कशा पद्धतीने करते त्यावर तुम्हाला घरी येण्याची लागलेली ओढ अवलंबून असते. काय वाटतंय तुम्हाला? तुमचं घर तुमचं स्वागत कसं करतंय?

©®अंजली दीक्षित

🎋🎋🌾🌾🌴🌴🌱🌱🎋🎋🌾

*_शेतकरी, कष्टकरी बांधवांसाठी एक छोटीशी मदत_*

*_🥭🌴आंबा, नारळ, सुपारी,आणि काजू साठी अत्यंत गरजेची असणारी उत्पादने_*

*🎋🌴🌾 Maharashtra agro fertilizer and chemicals* 🎋🌴🌾
*kolhapur*

*_👉डायरेक्ट फॅक्टरी दरांमध्ये, उपलब्ध._*
*_👉मधल्या कुठल्याच मेडीयटरचा समावेश नसल्यामुळे कमी दरांमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे सेंद्रीय खत उपलब्ध_*
*_👉 कल्पवृक्ष आणि निंबोळी पावडर संतुलन ऑर्डर नुसार पोहच करण्याची व्यवस्था_*

*🔹जमिनीच्या सुपीकते बरोबरच उत्पन्नात देखील भरघोस वाढ*

*🔸पिकांची उत्तम वाढ*
*🔹 रोग प्रतिकारक शक्ती वाढते*
*🔸जमिनीचा सामू समान ठेवण्यास मदत*
*🔹 पानांचा व फळांचा आकार वाढतो*
*🔸फळे मोठी होणे*
*🔹प्रकाश संश्र्लेशन कार्य वाढवते.*
*🔸निरोगी आणि विषमुक्त पिके*

*👉आजच संपर्क करा*

*Maharashta agro fertilizer and chemicals.kolhapur.*

*📲9823857786*
*📲8208657954*

*Advt web link 👇*

———————————————-

 

प्रतिक्रिया व्यक्त करा