You are currently viewing विसर्जन
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

विसर्जन

*अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे संस्थेच्या ठाणे जिल्हाध्यक्षा लेखिका कवयित्री सौ.अनिता गुजर लिखीत अप्रतिम लेख*

*विसर्जन*

आज विसर्जनाचा दिवस .
चतुर्थीला पार्थिव गणेशाची स्थापना करून आपापल्या रितीनुसार किंबहुना वेळेनुसार या पार्थिव गणेशाचे विसर्जन करतात.
मी मुद्दाम पार्थिव म्हणते कारण गणपती ही एक शाश्वत देवता आहे ,हे एक तत्व आहे याचे विसर्जन कधीच होऊ शकत नाही.गणेश हा देवांचा देव,अधिपती…प्रत्येक शुभ कार्याची सुरवात गणेश पूजनानेच होते. मग तुम्हीच सांगा याचे विसर्जन कसे होणार आणि ते करणारे आपण कोण? विसर्जन ही केवळ मनाची भावना आहे.’गणपती बाप्पा मोरया,पुढल्या वर्षी पुन्हा या’ असे म्हणत विसर्जन करतात. खर तर विसर्जन होते ते आपल्यासारख्या माणसांचे .टिळकांच्या प्रबोधनानुसार सर्वांनी एकत्र येऊन आंनद साजरा करावा हा उद्देश समोर ठेवून आपण गणपतीची स्थापना करतो.विसर्जन करून तो कुठेही जात नाही. तो इथेच असतो आपल्या अवतीभोवती, आपल्या अंतरात ,आपल्या मनाच्या देव्हाऱ्यात. खरतर विसर्जन कशाचे झाले पाहिजे ह्याचा विचार आपण केला पाहिजे…आपल्यातील षड्रिपुंचे विसर्जन झाले पाहिजे, आपल्यातल्या आळशी वृत्तीचे,निराशेचे,आपल्यातील नकारात्मक विचारांचे विसर्जन झाले पाहिजे.मनात येणाऱ्या एकमेकांच्या हेवेदावेचे ,वाईट सवयींचे ,एखाद्या बद्दल असलेल्या असुया,द्वेष यांचे विसर्जन करणे ही काळाची गरज आहे.आपण ह्या सर्व वाईट प्रवृत्तींचे विसर्जन केले तर आपोआप आपली सारी विघ्ने दूर होतील आणि चहूकडे आनंदी आंनद नांदेल….
शेवटी एवढेच बोलेन….

जाहले भजन आम्ही नमितो तव चरणां,
वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना..!!

निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी देवा आज्ञा असावी..,
चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी ..!!

*गणपती बाप्पा मोरया* 🙏🙏🙏

सौ.अनिता गुजर
डोंबिवली
८०९७५२४१९७

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − one =