You are currently viewing वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे

*अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे संस्थेच्या ठाणे जिल्हाध्यक्षा सौ.अनिता गुजर यांचा अप्रतिम लेख*

🌳वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे🌳

दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.पण आता प्रत्यक्षात काही वेगळेच चित्र दिसते आहे.  माणसाने निसर्गाला स्वतःची एकट्याची मालमत्ता असल्यासारखे वापरून घेतले. वृक्षतोड, जंगल छाटणी, खनिज शोधासाठी खाणी खोदकाम, प्लास्टिकचा अतिवापर, हवा, नद्या, समुद्र यांचे प्रदूषण अशा अनेक गोष्टींनी आपण पर्यावरणाचे संतुलन बिघडवले. या पृथ्वींवरील कितीतरी प्राण्यांच्या, वनस्पतींच्या प्रजाती माणसांमुळे नष्ट झाल्यात.

टास्मानियन वाघ, आफ्रिकन गैंडा, डोडो बदक ह्या सारखे प्राणी आपण फक्त आत्ता चित्रात बघू शकतो.हि जैवविविधता आपण जपली पाहिजे. या पर्यावरण संवर्धनासाठी, आपण नागरिकांनी जागरूक होण्यासाठी या निसर्गाचा अभ्यास करण्यासाठी हा पर्यावरण दिन साजरा केला जातो.

पृथ्वीवर वेळी-अवेळी पाऊस, भूकंप, पेटलेले वणवे, अचानक येणारी वादळे याकडे आपण सजगपणे पाहिले पाहिजे. मानवी जीवन कितीही प्रगत झाले तरी ते निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाचे संवर्धन हे आपलेच संवर्धन आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. ही जबाबदारी अगदी प्रत्येकाची आहे ,मोठ्या जाणकार माणसांसोबतच लहान मुलेसधा या महत्त्वाच्या कामात खारीचा वाटा उचलू शकतो. घरातला कचरा औंला व सुका वेगळा करू शकतो.

घरात व गच्चीत विविध झाडे लावू शकतो. प्लास्टिकचा कमी वापर करून असेलेले प्लास्टिक विघटनासाठी वेगळे करू शकतो. आजूबाजूच्या पक्ष्यांची काळजी घेऊ शकतो. हे विश्वची माझे घर हा विशाल व भव्य दृष्टीकोन  आहे. आपल्या कुटुंबा पुरते मर्यादित न रहाता सारे विश्व कुटुंब असून आपण त्यातले एक आहोत ह्या उद्दात हेतूने जीवन जगले पाहिजे.आपल्यालाही सर्वांबरोबर  राहावे असे वाटते .  सर्व पशु, पक्षी एकत्र कळपाने राहतात, कारण त्यात एक प्रकारची सुरक्षितता असते. एकटेपण म्हणजे भीतीचे घर असते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेम. प्रेमाशिवाय जगणे शक्य नाही. प्रेम ही माणसाची प्रथम गरज आहे. भावनात्मक सुरक्षितता प्रेमातच मिळते. जीवनातील सर्वात सुंदर गोष्ट प्रेम आहे. प्रेम म्हणजे आनंद,  म्हणून प्रेम देतं व घेतं,  सर्वांनी साथीने जीवन यात्रा करायची असते.निसर्गाकडे पहिले तर सारे एकमेकाच्या सहवासात असतात. पाखरे झाडांवर रहातात, पाण्यात मासे इतर प्राणी रहातात, फुलांवर फुल पाखरे आनंदाने बागडतात. चंद्र, सूर्य, वारा, पाऊस, पृथ्वी साऱ्यांचे पालन  पोषण करतात,  हा निसर्ग आपल्या सर्वांसाठी आहे. त्याच्या कुशीतच आपण वाढतो, जगतो. विश्वात सहजीवन आहे प्रेम आहे म्हणून आनंद आहे. एकटेपणात दु:ख आहे म्हणून हे विश्वची माझे घर या विशाल हृदयाने, सर्वाना सामावून घेतले पाहिजे. सर्वाना आपल्या बरोबर घेऊन  चालायचे आहे.  त्यातच सार्थकता आहे. निसर्ग, पशु, पक्षी सर्व   स्वधर्माप्रमाणे रहातात. माणसानेही निसर्गाकडून शिकून आपला स्वधर्म पाळाला पाहिजे,हो ना….!!

सौ.अनिता गुजर

ठाणे जिल्हा अध्यक्षा

8097524197

प्रतिक्रिया व्यक्त करा