You are currently viewing स्मृति भाग ६२

स्मृति भाग ६२

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम काव्यरचना*

*स्मृति भाग ६२*

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .
आज व्यास पौर्णिमा . *गुरुपौर्णिमा* त्यांना सादर , सविनय , साष्टांग प्रणिपात करतो 🙏🙏, तसेच माझ्यावर आजवर ज्यांनी ज्यांनी संस्कार केले त्या सर्वांना भावपूर्ण वन्दन करतो व उर्वरित अध्याय पुढे सांगतो .
“आमचा हा ना अहो , तो *योगा* करायला गेलाय ! केवढा आनंद सांगतांना ! *योग* हा शब्द आहे का *योगा* ? खरं तर योग ही विद्या आहे , म्हणायचे असेल तर *योगविद्या* असा पूर्ण उच्चार करा ! योगा काय योगा ?? चुकीच्या गोष्टींचे समर्थन करणारे अजून एक नवा शब्द वापरतात , *जनरेशन गॅप* या शब्दाने सारी संस्कृती उद्ध्वस्त करण्याचे काम केले !! नीति , न्याय , शिस्त , शिक्षण आणि कर्म यांना कशाचा आला जनरेशन गॅप ?? कधी कधी शब्द ही हरामखोरी करतात ! त्यातला हा शब्द !! जावू द्या , पुढे पाहू . विषयांमधे आसक्त चित्त ज्याचे आहे , तो मोक्ष कसा प्राप्त करेल ? म्हणून त्याने आसक्ति सोडावी , ही सन्याशींसाठी दिलेली स्पष्ट सूचना आहे . आपल्याकडे ” संभोगातून समाधिकडे ! ” असे तत्व सांगणार्‍यांनाही कुणाची प्रतिप्रश्न विचारण्याची हिम्मत नाही !! ही कशाची लोकशाही ?? अशा तथाकथित विद्वानांसाठी दक्षांनी स्पष्ट लिहिले आहे—>

*विषयेन्द्रियसंयोगं केचिद्योगं वदन्ति हि ।*
*अधर्मो धर्मरुपेण गृहीतस्तैरपण्डितैः ॥*
काही लोक विषयांसह इन्द्रिय संयोगालाच योग मानतात . त्या मूर्खांद्वारे तर अधर्मच धर्मरुपाने ग्रहण केला गेला आहे .
काही तर मन व आत्म्याचे संयोगालाही योग म्हणतात , अशांना आगोदरच्या मूर्खांपेक्षाही अज्ञानी म्हणून संबोधले आहे .

*वृत्तिहीनं मनःकृत्वा क्षेत्रज्ञं परमात्मनि ।*
*एकीकृत्य विमुच्येत योगोSयं मुख्य उच्यते ॥*
मनाच्या सर्व वृत्तींना हटवून जीवास परमात्म्याच्या एकीभावास प्राप्त करुन मनुष्य जीवनमरणाच्या बन्धनातून मुक्त झाला की त्यास मुख्य योग संबोधले आहे .
सध्या चीन आपल्यालगत असणार्‍या चौदा पंधरा देशांच्या काही भूमीवर आपला अधिकार सांगत आहे ! अशा परिस्थितीत पुढील श्लोक खूप योग्य वाटतो . पहा .

*बलेन परराष्ट्राणि गृण्हन् शूरस्तु नोच्यते ।*
*जितोयेनेन्द्रियग्रामः स शूरः कथ्यते बुधैः ॥*
बलाने दुसर्‍या राष्ट्रास जिंकणारा मनुष्य शूर म्हणला जात नाही . ज्याने इंद्रियांचे समूहास जिंकले आहे अशीच माणसे ज्ञानियांकडून शूर म्हणवली जातात .
एक ऐकलेली कथा सांगतो . तिबेटकडील बुद्ध कथा आहे . नागार्जुन नावाचे योगी होवून गेले . वैद्यकशास्त्राचेही त्यातही रसशास्त्राचे प्रगाढ अभ्यासक ! गुरुकुलात शिकलेले बौद्ध वैद्यक ( हे समजण्यासाठी की गुरुकुलात सर्वांना स्थान होते ! ). त्यामुळे त्यांना मानणारे भरपूरच ! इतके की राजालाही धास्ती त्याच्या पदाची ! एवढी समाजमान्य योग्यता ! एकदा ते तपस्येला बसले . ही बातमी कान फुंकणारांनी राजास सांगितली . राजा गेला त्यांना मारायला ! तलवार उगारली व हाणली की मानेवर !! पण तपस्या करणार्‍या त्या योगियाच्या मानेवर आदळून तात्काळ परत गेली तेवढ्याच जोरात , लोखंडावर आपटावी तशी !! राजा घाबरला व आला तसा निघून गेला !! इकडे तप संपल्यावर नागार्जुना सगळे समजले . ते तात्काळ राजाकडे गेले व म्हणाले , ” राजा , मी आलो आलो आहे , आता उडव माझे मुंडके . त्यावेस मी असे रसायन खाल्ले होते की माझ्यावर कुठल्याही गोष्टीचा असर होणार नाही व तपस्येत भंग पडणार नाही !! आता मी त्या औषधाचे विरुध्द औषध खावून प्राकृत प्रकृतीचा झालो आहे व माझेजवळ हत्यारही नाही !! ” राजाला लाज वाटली व त्याने सर्व प्रजाजनांसमोर क्षमायाचना करुन यथोचित सत्कारही केला . त्यावेळेस तिबेट भारताचाच भाग होता . असे पुरुष ज्या देशात जन्मले अशा देशात जर हीन व दुष्ट प्रवृत्तीला थारा देणार्‍यांना कसे शासन झाले पाहिजे ? विचार करा . उद्या पुढे पाहू .
तशा सर्वच स्मृति वाचनीयच आहेत , चिंतनीय आहेत , मननीय आहेत आणि प्रवचनीय ही आहेत . वाचाल ना स्मृति ? 🙏🙏
🙏🙏
इत्यलम् ।
🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩
*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*
पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६
९८२३२१९५५०/८८८८२५२२११
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

*संवाद मीडिया*

*रॉयल इस्टेट एजंट*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

*_🏡कोकणात फार्म हाऊस हवय…_*
*👉तर मग आमच्याकडे संपर्क साधा….*

*आमची खास वैशिष्ट्ये*👇

*▪️फळबागायतीसाठी जमीन खरेदी व विक्रीसाठी मदत*

*▪️पाणी व वीजपुरवठा असणारी जागा शोधून देणे*

*▪️जमिनीचे खरेदी व विक्रीसाठी आवश्यक दस्तऐवज तयार करून मिळतील*

*▪️वीज पुरवठ्याची कामे केली जातील*

*▪️फळबाग लागवड, पशुधन गाय व शेळी कुक्कुट पालन साठी सल्ला मिळेल.*

*▪️5 गुंठा ते 50 एकर पर्यंत क्लिअर टायटल प्लांट उपलब्ध*

*संपर्क*
*📲8928513279*
*📲9356724770*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/118963/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा