You are currently viewing श्री.दादा कुडतरकर यांचा समाजसेवेत खारीचा वाटा

श्री.दादा कुडतरकर यांचा समाजसेवेत खारीचा वाटा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी असिस्टंट गव्हर्नर रोटरी क्लब सिंधुदुर्ग, तसेच अनेक नामवंत संस्थांचे विश्वस्त, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. दादा कुडतरकर यांचा १२ ऑक्टोबर रोजी ६३ वाढदिवस होता. समाजसेवेचे व्रत घेतलेल्या दादांना आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजासाठी काहीतरी करण्याची मनीषा झाली. समाजात अनेक आबालवृद्ध आयुष्याची शेवटची वर्षे काहींना काही कारणांनी वृद्धाश्रमांमध्ये व्यतीत करतात. त्यांच्या आयुष्यातील गेलेलं हास्य परत आणण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून दादांनी असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमास काही साहित्य भेट म्हणून देण्याचे ठरविले आणि वाढदिवसाचे औचित्य साधत आपला समाजसेवेचा वसा देखील जपला.
असलदे येथे दिविजा वृद्धाश्रमात अनेक वृद्ध राहतात. वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी अनेक गोष्टींची आवश्यकता असते. दादांनी वृद्धांची गरज ओळखून दिविजा वृद्धाश्रमास एक मेगा फॅन प्रदान केला त्याचबरोबर २०० डायपर देऊन सामाजिक वसा जपला. दिविजा आश्रमातील ज्येष्ठ नागरीकांनी मोठ्या उत्साहात दादांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी रोटरी क्लब कणकवलीचे प्रेसिडेंट रो. विद्याधर तायशेट्ये, दीपक अंधारी, महेंद्र मुरकर, संतोष कांबळी, रवींद्र मुसळे, सौ.रंजना कुडतरकर आदी उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी दादा दरवर्षी आपला वाढदिवस वेगवेगळ्या आश्रमात साजरा करतात हे विशेष कौतुकास्पद…!


वृद्धाश्रमातील कार्यक्रमाच्या पूर्वी श्री दादा कुडतरकर यांच्या वाढदिवसानिमित्त रोटरी क्लब कणकवली, आयोजित पाककला स्पर्धेला आणि विधी अन न्याय समिती चर्चासत्राच्या देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. कणकवलीचे विख्यात वकील उमेश सावंत व निकिता म्हापणकर, डॉ.प्रतिमा नाटेकर यांचे अतिशय उत्तम कायदेशीर मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे पाककला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देखील प्रदान करण्यात आली. रोटरी क्लब कणकवली परिवारातर्फे सामाजिक कार्यकर्ते श्री.दादा कुडतरकर यांचा सत्कार करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा