You are currently viewing उज्जैनकर फाऊंडेशनच्या बुलढाणा संपर्क कार्यालयाचे – उदघाटन

उज्जैनकर फाऊंडेशनच्या बुलढाणा संपर्क कार्यालयाचे – उदघाटन

चिखली :

उज्जैनकर फाऊंडेशन मुक्ताईनगर जि. जळगांवच्या विभागीय संपर्क कार्यालयाचे उदघाटन थाटात संपन्न झाले. यावेळी संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. शिवचरण उज्जैनकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

साहित्य क्षेत्रात प्रगती व साहित्यिक कवी रसिक जोडले जावेत तथा मराठी भाषा संवर्धन व्हावे या मुख्य हेतूने डॉ शिवचरण उज्जैनकर सरांनी फाऊंडेशनची निर्मिती केली असून विविध उपक्रम हाताळत आहे. बुलढाणा जिल्हयात बुलढाणा जिल्हा संपर्क कार्यालय असावे. हेतूने चिखली शहरात, श्री खटकेश्वर महाराज मंदीरा समोर सदर कार्यालयाचे फलकाचे उद्घाघाटन संस्थापक मा. डॉः शिवचरण उजैनकर यांचे हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष – शाहीर मनोहर पवार, राज्य संपर्क प्रमुख डॉ. पंढरीनाथ शेळके, खामगाव विभागीय अध्यक्ष शंकर अनासने, सदस्य बाळाभाऊ इटनारे, आणि राज्य का.सदस्य ह.भ.प. शंकर महाराज येळगांवकर, सुनिल मुंदोकार तसेच, राज्य प्रसिद्धी प्रमुख कवी-लेखक, बबनराव वि. आराख, डॉ. मंजुराजे जाधव, जिल्हा का . सदस्य, प्रदिप मोरे रवी पाटील, सोनू वाळेकर, प्रमोद सुर्यवंशी किशोर कणखर सर व विशाल जवरकार, गजानन जवरकार सदस्य, कवी प्रशांत पाटील, कवी नंदी, जिल्हा संघटक – भगवान पाटील आदी पदाधिकारी सदस्य या वेळी हजर होते. दरम्यान, पाहूण्यांना चहापाणी फराळ व्यवस्था प्रमोद सुर्यवंशी यांनी सांभाळली.

साहित्य क्षेत्रातील नामवंत संस्था उज्जैनकर फाऊंडेशन ही महाराष्ट्रात अग्रगण्य संस्था असून गेल्या पंधरा वर्षापासून विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून साहित्य संमेलने आयोजित करणे ‘वाचन संस्कृति जपणे आरोग्य शिबीर वृक्षारोपन फिरते वाचनालय,’ आदी उपक्रम असून संस्थापक अध्यक्ष मां. डॉ. शिवचरण उजैनकर यांना विविध पुरस्कार प्राप्त असून मानद डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले आहे. संस्थेचे महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात शाखा आहेत पदाधिकारी आहेत . राज्यात व राज्याबाहेर संमेलन होत असून बाहेरच्या देशात मराठी भाषेचा गोडवा व आवड निर्माण व्हावी म्हणून संमेलन घेण्याचा त्यांचा मानस आहे.

दरम्यान, पाहुण्यांना चहापान आणि सुग्रास नास्ता याची श्री.प्रमोद सूर्यवंशी यांनी उत्तम व्यवस्था केली. तर, जिल्हा अध्यक्ष,शाहीर मनोहर पवार सर यांनी, आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा