You are currently viewing झाराप ग्रामपंचायत स्ट्रीट लाईट संदर्भात शिवसेना सरपंच, उपसरपंच संघटनेचा वेंगुर्ला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला शॉक

झाराप ग्रामपंचायत स्ट्रीट लाईट संदर्भात शिवसेना सरपंच, उपसरपंच संघटनेचा वेंगुर्ला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला शॉक

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने कुठलीही नोटीस न देता अचानक पणे झाराप या गावातील स्ट्रीट लाईट वीज कनेक्शन कट करण्यात आली. यासंदर्भात आज संध्याकाळी 5 वाजता कुडाळ शिवसेना सरपंच एकत्रित येत वेंगुर्ला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी विरोधात तेथे जात आक्रमक पवित्रा घेतला अशातच या शिवसेना सरपंच ,उपसरपंच अधिक आक्रमक बनले आणि शेवटी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे वेंगुर्ला येथील खटावकर साहेबांनी नमतेपणा घेत तेथील झाराप येथील अभियंता तोंडले यांना झाराप ग्रामपंचायतीच्या बंद केलेल्या स्ट्रीट लाईट चालू करण्याचा आदेश दिला. स्ट्रीट लाईट संदर्भात कुडाळ तालुका सरपंचाची एकत्रित बैठक जो पर्यंत घेत नाही व योग्य मार्गदर्शन होत नाही तोपर्यंत लाईट बिल भरली जाणार नाही.असा इशारा देण्यात आला.

यावेळी नेरुर सरपंच शेखर गावडे,पावशी सरपंच बाळा कोरगावकर,कुंदे सरपंच सचिन कदम, मांडकुली सरपंच तुषार सामंत, हुमरस सरपंच अनुप नाईक, कवठी सरपंच रुपेश वाड्येकर,झाराप सरपंच स्वाती तेंडुलकर, हळदीचे नेरूर सरपंच सागर म्हाडगुत,झाराप उपसरपंच मांजरेकर,मांडकुली उपसरपंच दिलीप नीचम, पावशी उपसरपंच दिपक आंगणे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा