You are currently viewing इचलकरंजी नगरपरिषद कर्मचारी काम बंद आंदोलनाचे उपसणार हत्यार

इचलकरंजी नगरपरिषद कर्मचारी काम बंद आंदोलनाचे उपसणार हत्यार

कर्मचारी समन्वय समितीची निवासी उपजिल्हाधिका-यांना नोटीस सादर

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी नगरपरिषद कर्मचारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २ मे पासून काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसणार आहे. या संदर्भात
इशारावजा नोटीस
इचलकरंजी नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना देण्यात आली आहे.

इचलकरंजी नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत इचलकरंजी नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून शासनाकडे
पाठपुरावा सुरु आहे.या संदर्भात पाच वर्षांपूर्वी दोन बैठका झाल्या होत्या. यात झालेल्या निर्णयावर अद्याप पुढील कार्यवाही झाली नसल्याचे दिसत आहे.त्यामुळे या संदर्भात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,
नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, प्रधान सचिव महेश पाठक यांच्यासमवेत बैठक घेण्याची मागणी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने
पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली होती. मात्र, अद्याप कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट येवून त्यांचे जगणे अत्यंत मुश्किलीचे बनत आहे. याच अनुषंगाने २ मे पासून इचलकरंजी नगरपरिषद कर्मचारी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसणार आहेत. याबाबत इशा-याची
नोटीस मुख्यमंत्री ठाकरे, नगरविकास मंत्री शिंदे यांच्यासह मुख्य सचिवांना देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील पालिकांना कर्मचारी समन्वय समितीने नगराध्यक्ष व मुख्याधिका-यांना या काम बंद आंदोलनाची नोटीस दिली असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पञकारांशी बोलताना सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 1 =