You are currently viewing नारायण राणेंनी संसदेतील कोकणची प्रतिष्ठा धुळीस मिळवली…!

नारायण राणेंनी संसदेतील कोकणची प्रतिष्ठा धुळीस मिळवली…!

*नारायण राणेंनी संसदेतील कोकणची प्रतिष्ठा धुळीस मिळवली…!*

*हिंदी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नसल्याने राणे देशभरात ठरले चेष्टेचा विषय…!!*

*आमदार वैभव नाईक यांचा नारायण राणेंवर हल्लाबोल…*

रत्नागिरी-सिंधुदुर्ग (पुर्वीचा राजापूर) लोकसभा मतदारसंघाचे बॅरिस्टर नाथ पै, प्रा. मधु दंडवते, सुरेश प्रभु यांसारख्या सुसंस्कृत व विद्वान उमेदवारांनी लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. बॅ. नाथ पै यांचे सभागृहातील भाषण ऐकण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू स्वतः उपस्थित असायचे. मधु दंडवते आणि सुरेश प्रभु यांच्या कार्यकर्तुत्वाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला. त्यामुळे हा मतदारसंघ विद्वान नेत्यांचा मतदारसंघ म्हणुन देशभरात प्रसिद्ध आहे. मात्र नारायण राणेंनी आपल्या केंद्रीय मंत्रीपदाच्या काळात संसदेतील कोकणची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे, असा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला.

तामिळनाडू मधील डीएमके पक्षाच्या खासदार कानिमोळी यांनी संसदेत इंग्रजीत प्रश्न विचारला की, जीएसटी, नोटाबंदी व त्यानंतर आलेल्या कोरोनाच्या संकटात ५० हजार लघु उद्योग बंद पडले आहेत आणि अनेक उद्योग बंद पडायच्या मार्गावर आहेत. सरकारने या उद्योगांना सावरण्यासाठी अनेक योजना सुरु केल्याचे सांगितले जात आहे पण प्रत्यक्षात अशा एकाही योजनेबाबत उद्योजकांना कोणतीही माहिती नाही. त्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करून उद्योजकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी सरकार कोणते प्रयत्न करणार आहे…? त्यावर केंद्रीय लघु, सुक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंनी असंबंध बडबड करून भलतेच उत्तर दिले. शेवटी राज्यसभा उपाध्यक्षानी त्यामध्ये हस्तक्षेप करत परिस्थिती सावरून घेत राणेंना खासदारांचा प्रश्न हिंदी भाषेत समजावून सांगितला आणि वेळ मारून नेली. मध्यंतरी एका पत्रकाराने सिबील स्कोअरमुळे राष्ट्रीय बँका उद्योजकांची कर्ज प्रकरणे फेटाळून लावतात याबाबत प्रश्न विचारला असता नारायण राणेंना सिबील स्कोअर म्हणजे काय हेच माहिती नसल्यामुळे त्यांच्या अशिक्षितपणाचा सर्वांनाच प्रत्यय आला. त्यांनी पत्रकाराला दिलेल्या एका मुलाखतीत परदेशातील रोमानिया शहराला चक्क वुमानिया देश म्हटले आहे. तरी नशीब त्यांनी चुकून निमोनिया देश म्हटले नाही. नारायण राणेंनी आपल्याच देशातील केरळ राज्याला स्वतंत्र देशाचा दर्जा देऊन आणि एका भाषणात उपस्थितांचे आभार व्यक्त करताना ‘शुक्रियादा करांगो’ अशी उच्च दर्जाची हिंदी भाषा वापरल्यामुळे ते देशभरात चेष्टेचा विषय बनलेले आहेत. नारायण राणेंनी केंद्रीय मंत्री असुन देखील शिवसेना आमदार भास्कर जाधवांना चोप देण्याची भाषा केली. एका केंद्रीय मंत्र्याला हे वर्तन नक्कीच शोभणारे नाही. नारायण राणेंनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली मारण्याची भाषा केल्यामुळे त्यांना केंद्रीय मंत्रीपदी विराजमान असताना अटक झाली होती. अगदी अलीकडेच राज्यसभेतील भाजप खासदार कार्तिकेय शर्मा यांनी एमएसएमई क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणाबाबत राज्यसभेत इंग्रजीत प्रश्न उपस्थित केला असता केंद्रीय मंत्री नारायण राणेंना त्यांच्या प्रश्नाचा अर्थच समजला नसल्यामुळे त्यांनी एमएसएमई मध्ये निर्यात कशा पद्धतीने वाढणार अशा आशयाचे असंबंध उत्तर दिले. शेवटी राज्यसभा उपाध्यक्ष हरिवंश सिंह त्यांच्या मदतीला धावले आणि त्यांनी इंग्रजीतील प्रश्न त्यांना हिंदीत समजावून सांगत वेळ मारून नेली. अशा प्रकारे नारायण राणेंच्या अज्ञानीपणामुळे संसदेतील कोकणाची प्रतिष्ठा पुर्णपणे धुळीस मिळालेली आहे. नारायण राणेंना खासदारांनी इंग्रजीत विचारलेले प्रश्नच समजत नसतील तर असा माणुस रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे आणि पुढे जावुन देशाचे प्रतिनिधीत्व कसे काय करणार…? नारायण राणेंना संसदेत पाठवून कोकणच्या इभ्रतीचे आणखीन धिंडवडे काढण्यापेक्षा त्यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पराभुत करणे कोकणी जनतेच्या द्रुष्टीने हितावह ठरेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा