You are currently viewing तुळस येथे एसटी-दुचाकीत अपघात, एक जण जखमी…

तुळस येथे एसटी-दुचाकीत अपघात, एक जण जखमी…

वेंगुर्ला

एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. हा अपघात आज सकाळी साडेदहा वाजता तुळस येथे घडला. नारायण शंकर पालकर (४७) रा.पाल-कदमवाडी, असे जखमीचे नाव आहे. याबाबत पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातग्रस्त एसटी सावंतवाडी वरून वेंगुर्लेच्या दिशेने जात होती. यावेळी तुळसकडे जाणाऱ्या दुचाकीची एसटीला समोरून जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. तर दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर एसटी चालकाने जखमीला तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. याबाबत वेंगुर्ले पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − five =