You are currently viewing कणकवली येथे यारा फाऊंडेशन कणकवली यांच्यामार्फत केक प्रशिक्षण शिबीर

कणकवली येथे यारा फाऊंडेशन कणकवली यांच्यामार्फत केक प्रशिक्षण शिबीर

आपला काहीतरी लहानसा का असेना पण व्यवसाय आहे आणि आपण त्याचे मालक आहोत, ही भावना प्रत्येकाला नवी उभारी देणारी असते. म्हणूनच अशा स्वतःचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी यारा फाऊंडेशन, कणकवली यांच्यामार्फत कणकवली येथे केक प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले. कोविड-१९ च्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत आणि पन्नास टक्के उपस्थितीत हे शिबीर संपन्न झाले. या प्रशिक्षण शिबिराला सर्व तालुक्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

गार्गी कसालकर व प्राजक्ता कदम यांनी या प्रशिक्षणार्थींना केक व्यवसायाबद्दल व केक तयार करण्याबाबत योग्य असे मार्गदर्शन केले.

सध्याच्या कोरोनाच्या काळात या केक किंवा बेकरी संबंधित व्यवसायातून एक चांगले मिळकतीचे साधन प्राप्त होऊ शकते. यारा फाउंडेशनचे उपक्रम फायदेशीर ठरणार अशी प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थ्यानी प्रतिक्रिया व्यक्त केली.

यारा फाउंडेशन मार्फत शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबविले जातात. तसेच सांस्कृतिक क्षेत्रातही यारा फाउंडेशन कार्यरत आहे. या अगरबत्ती प्रशिक्षण शिबिराला यारा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विश्वराज सावंत, नीलम राणे, समीर परब, पत्रकार श्रेयश शिंदे उपस्थित होते.

प्रस्ताविक श्रेयश शिंदे यांनी केले. हा कार्यक्रम कोविड नियमांचे पालन करत, सामाजिक अंतर राखून पार पडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − two =