You are currently viewing मुंबई विद्यापीठाच्या ५५ व्या युथ फेस्टिवलच्या सिंधुदुर्ग विभागीय स्तरावरील मेहेंदी डिझाईन स्पर्धेमध्ये कुडाळची अर्पिता राऊत तृतीय

मुंबई विद्यापीठाच्या ५५ व्या युथ फेस्टिवलच्या सिंधुदुर्ग विभागीय स्तरावरील मेहेंदी डिझाईन स्पर्धेमध्ये कुडाळची अर्पिता राऊत तृतीय

कुडाळ :

कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये नुकत्याच पार पडलेल्या ५५ व्या युथ फेस्टिवल मध्ये कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै कला वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालयाच्या अर्पिता सखाराम राऊत (तृतीय वर्ष वाणिज्य) या विद्यार्थिनीने अतिशय सुरेख मेहंदी डिझाईन करून तृतीय क्रमांक पटकावला आहे. तिची 27 सप्टेंबर 2022 रोजी मुंबई येथे होणाऱ्या युथ फेस्टिवलच्या अंतिम फेरीत निवड झालेली आहे. तिला या कामी महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राजक्ता जाधव व प्रांजना पारकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले .तिच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, संस्थाचालक व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा