You are currently viewing पाडलोस येथील पखवाज वादक गंगाराम (उर्फ)अमेय तुकाराम गावडे यांना कला सन्मान पुरस्कार

पाडलोस येथील पखवाज वादक गंगाराम (उर्फ)अमेय तुकाराम गावडे यांना कला सन्मान पुरस्कार

बांदा

पुणे येथील ‘आर्ट बिटस् फाऊंडेशन’तर्फे कला क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या कलाकारांना देण्यात येणारा राज्यस्तरीय कला सन्मान पुरस्कार सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस येथील पखवाज वादक गंगाराम उर्फ अमेय तुकाराम गावडे यांना जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाचा पाश्र्वभूमीवर हे पुरस्कार ऑनलाईन पध्दतीने प्रदान करण्यात येणार आहेत. श्री ईस्वटी संगीत विद्यालयच्या वर्गाद्वारे विद्यार्थ्यांना पखवाज, ढोलकी, तबला वादनाचे शिक्षण देत आहेत.त्यांनी हनुमंत मेस्त्री, डॉ. दादा परब, पं. विश्वनाथबुवा पाटील, राजाराम जामसंडेकर य‍ा गुरुकडे गेली २१ वर्षे पखवाज, ढोलकीचे शिक्षण घेत आहेत.त्यांना विविध पुरस्कार मिळविले. दिल्ली येथून ‘स्टार आँफ इंडीया २०२०, श्री सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी मुंबई पुरस्कार, तसेच विशेष कार्यक्रम – विविध भजन स्पर्धा,गीत-गीतामृत, ध्रुव संस्कृत बँड (भोपाळ),श्री शंकरा टीव्ही जागतिक भजन स्पर्धा, श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथील कार्यक्रमात सहभाग घेतला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 19 =