You are currently viewing कोल्हापूर मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांची गावे निर्माण होणार – सत्यवान यशवंत रेडकर

कोल्हापूर मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांची गावे निर्माण होणार – सत्यवान यशवंत रेडकर

 

महाराष्ट्र राज्य पोलीस प्रवाह न्यूज, समाज विकास केंद्र संचलित स्वामी विवेकानंद अभ्यासिका यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर नुकतेच पार पडले.

स्पर्धा परीक्षा क्षेत्रात तज्ञ समजले जाणारे उच्च विद्याविभूषित मार्गदर्शक, ज्यांचा वन मॅन शो नेहमीच सुपरहिट ठरतो. महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थी ज्यांच्या वाणीने प्रेरित होऊन स्पर्धा परीक्षेचा मार्ग अवलंबतात. सलग दोन ते अडीच तास उभा राहून मंत्रमुग्ध करणारे परंतु स्पर्धा परीक्षा विषय अत्यंत खोलवर जाऊन कोणतेही मानधन व प्रवास भत्ता न घेता ज्ञानदान करणारे सीमाशुल्क अधिकारी, श्री सत्यवान यशवंत रेडकर यांनी असंख्य कोल्हापूर वासियांचे विद्यार्थी, श्रोता, पालक वर्ग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अशा स्वरूपात मन जिंकले. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच आपली क्रमिक पुस्तके वाचून त्याचा अभ्यास चांगला करावा. दहावी बारावीनंतरही केंद्रीय स्तरावर अनेक परीक्षा घेतल्या जातात, त्यामध्ये आपण प्रशासनात येण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो. यासाठी आपले कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे असे रेडकर सरांनी प्रतिपादन केले.

रेडकर यांनी सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज, गणित,इंग्रजी व्याकरण इत्यादी विषयात कोणतेही इतर क्लासेस न लावता स्वयं अध्ययन करून स्पर्धा परीक्षा अभ्यास कसा करावा याची विद्यार्थ्यांना माहिती दिली.

*सदर व्याख्याने शिबीर सिद्धनेर्ली विद्यालय व जुनिअर कॉलेज सिद्धनेर्ली, डी.आर.माने महाविद्यालय कागल, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज कोल्हापूर,व्यंकटेश एज्युकेशन सोसायटी हुपरी, हनीमनाळ (गडहिंग्लज) या ठिकाणी हाऊसफुल्ल संपन्न झाले.*

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × two =