You are currently viewing पंचगंगा नदीतील पाणी दूषित ; हजारो मासे मृत्यूमुखी

पंचगंगा नदीतील पाणी दूषित ; हजारो मासे मृत्यूमुखी

प्रदूषणास जबाबदार संबंधित घटकांवर कारवाईची मागणी

इचलकरंजी / प्रतिनिधी

शिरढोण येथे पंचगंगा नदीतील दूषित पाण्याने हजारो मासे मृत्यूमुखी पडले आहेत.यानिमित्ताने पंचगंगा नदी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोस पावले उचलून प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या संबंधित घटकांवर कारवाई करावी ,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालिघाटे यांनी केली आहे.

इचलकरंजी शहराबरोबरच अनेक गावांची रक्तवाहिनी असलेल्या पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न या ना त्या कारणाने सातत्याने
चर्चेत येत असतो.इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने सामाजिक संस्था , संघटनांच्या मदतीतून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरु केले आहेत.असे असले तरी अजूनही काही घटकांकडून नदी प्रदूषित करण्याचा प्रयत्न होत आहे.याचाच परिणाम म्हणून पंचगंगा नदी प्रदूषित होवून या पाण्याला दुर्गंधी सुटून नदीतील हजारो मृत्यूमुखी पडल्याचा प्रकार नुकताच शिरढोण येथे उघडकीस आला आहे.याठिकाणच्या पंचगंगा नदीपात्रात हजारो मासे मृत्यूमुखी पडल्याने नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालिघाटे यांनी पञकारांशी बोलताना केला.तसेच पंचगंगा नदीतील दूषित पाण्याने नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषणास जबाबदार संबंधित घटकांवर कायदेशीर कारवाई करावी .तसेच इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा होणा-या कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनला वारंवार गळती लागून हजारो लिटर पाण्याची नासाडी व
शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
याचा इचलकरंजी नगरपरिषद प्रशासनाने विचार करुन पाइपलाईनची तातडीने दुरुस्ती करुन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळावे ,अशी मागणी देखील श्री.बालिघाटे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 10 =