You are currently viewing वैश्य समाज कणकवली तर्फे दादा कुडतरकर यांचा सत्कार

वैश्य समाज कणकवली तर्फे दादा कुडतरकर यांचा सत्कार

कणकवली

वैश्य समाज कणकवलीच्या मुख्य सल्लागारपदी दादा कुडतरकर यांची नेमणूक करण्यात आली आहे.तर वैश्य समाज कणकवलीच्या अध्यक्षपदी महेंद्रकुमार मुरकर, सेक्रेटरी गुरुनाथ पावसकर, उपाध्यक्ष लहू पिळणकर, कोषाध्यक्ष विलास कोरगावकर,सदस्यपदी सर्वश्री राजन पारकर,प्रसाद अंधारी,उमेश वाळके,सुनील पारकर,नंदकुमार काणेकर, सौ नीलम धडाम, सौ. शीतल सापळे तर सल्लागारपदी सर्वश्री दादा कुडतरकर, दीपक अंधारी,आनंद अंधारी,राजेश सापळे,नागेश मोरये (नांदगाव), श्रीकृष्ण नानचे (फोंडाघाट),प्रकाश पारकर बुवा (कासारडे) यांची सरवानुमते निवड करणेत आली,

वैश्य समाज कणकवली या संस्थेची वार्षिक सर्व साधारण सभा येथील विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे दादा कुडतरकर यांचे अध्यक्षते खाली संपन्न झाली,यावेळी काशी पदयात्री अन 75 वर्षावरील वैश्य समाजातील बांधवांचे शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करणेत आले,यावेळी आनंद अंधारी यांनी वैश्य समाज कणकवली यांना वैश्य भवन कणकवलीसाठी 1 एकर जागा विना मोबदला देण्याचे कबूल केलेने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला, सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांनी त्यांच्या 3 वर्षे कालावधीत विशेष कार्य केल्याने त्यांचा विशेष सत्कार करणेत आला
वधुवरांची स्वप्ने सफल होण्यासाठी, भव्य वधुवर सोहळा अन स्नेह संमेलन, कोरोना कालावधी असूनही सन 20-21 अन 21-22 मध्ये 10 वी 12वी मधील समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार.सन 20-21 मध्ये अतिवृष्टी कामी अवर्षण प्रवण भागातील सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी मुख्यमंत्री फंडास रक्कम रु10000 वैश्य समाज द्वारा तहसीलदार कणकवली यांचेकडे अदा.जात पडताळणी कामी प्राथमिक जलद दाखले देणेसाठी प्रांताधिकारी कणकवली याना निवेदन.हळदीपुर गुरुमठ द्वारा आयोजित 2 महिने चातुर्मास सोहळा आयोजन . वैश्य समाज कणकवली द्वारा जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू अन सन्मानचिन्ह देऊन भव्य सत्कार. श्री श्री वामनाश्रम स्वामी यांचे 3500 किमी पदायात्रेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन काशी येथील सांगता समारंभात सर्वांच्या उपस्थितीसह अन सहकार्याने सक्रिय सहभाग.समाजातील सरपंच, उपसरपंच अन सदस्य यांचा सत्कार.पदयात्री अन 75 वर्षे वरील जेष्ठ समाज बांधवांचा सत्कार यासारखे विविध उपक्रम राबविले.

प्रतिक्रिया व्यक्त करा