संसदीय अधिवेशनात होणार हे बदल. . .

संसदीय अधिवेशनात होणार हे बदल. . .

दिल्ली :

कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या १८ दिवसाचे पावसाळी अधिवेशन आज पासून सुरू झाले आहे. मात्र संसदीय अधिवेशना मध्ये बर्‍याच गोष्टी पहिल्यांदाच घडत आहेत.

ज्यामध्ये सकाळ आणि संध्याकाळच्या दोन्ही वेळा ह्या बैठकीचा समावेश असणार आहे आणि अधिवेशनात एकाही सुट्टीचा दिवस नाही आहे. केवळ त्या लोकांना संसद आवारात प्रवेश देण्यात येईल, ज्यांच्याकडे कोव्हिड -१९ ची न झाल्याचा पुष्टी करणारा अहवाल असेल.

या काळात लोकांना मुखवटे(मास्क) घालणे बंधनकारक असेल. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी खासदार आणि संसद असे कर्मचार्‍यांसह ४,००० हून अधिक जणांची कोरोना चौकशी केली गेली आहे. यावेळी संसदेतील बहुतेक कामे डिजिटल मार्गाने केली जाणार आहे आणि संपूर्ण कॅम्पस संक्रमणमुक्त करण्याबरोबरच दरवाजे स्पर्शमुक्त केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा