You are currently viewing नाहूर भारतीय स्टेट बँकेचे कर्तव्यदक्ष रोखपाल भरत पाटील ४० वर्षाच्या सेवेतून निवृत्त !

नाहूर भारतीय स्टेट बँकेचे कर्तव्यदक्ष रोखपाल भरत पाटील ४० वर्षाच्या सेवेतून निवृत्त !

मुंबई :  काही माणसे आपल्या कामगिरीने मनें जिंकून घेत सर्वांना आपलेसे करून घेतात. तसेच कर्मचाऱ्यासोबत, ग्राहकांना सुध्दा जीव लावतात. अशांपैकी बँकचे रोखपाल भरत रामचंद्र पाटील हे आहेत. त्यांनी भारतीय स्टेट बँकेच्या नाहूर भांडुप शाखेत उत्तमप्रकारे सेवा देऊन बँकेला नावलौकिक मिळवून दिला असे बँक व्यवस्थापक सिध्देश सातपुते यांनी पाटील यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना गौरव उद्गार काढले. प्रारंभी सौ. प्रिया कांबळे यांनी श्री .भारत पाटील यांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला. याप्रसंगी बँक व्यवस्थापक सिध्देश सातपुते म्हणाले की, भारत पाटील यांनी बँक मध्ये नोकरी करीत असताना आपल्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या धाडसी स्पर्धात सहभाग घेऊन बरेच पुरस्कार मिळविले असून आज ते कित्येक ठिकाणी परिक्षक म्हणून परिचित आहेत. दरम्यान त्याहीपेक्षा त्यांची दुसऱ्यांना मदत करण्याची सेवाभावी वृत्ती त्यांनी ठाणे कोपरी गावात जोपासल्याने कित्येकांना आपलेसे केल्याने निवृत्ती काय करावं असा प्रश्न उपस्थित होत नसल्याचे प्रतिपादन करून पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी ठाण्याचे माजी नगरसेवक रमाकांत पाटील बँकेत नोकरी करून सामाजिक बांधिलकी जपत वारकरी संप्रदाय सहभागी होत पाटील यांनी आपले वेगळेपण जपले असे नमूद केले. यावेळी ह.भ.प. इंदौर महाराज, डॉ. प्रमोद भोपी, रवी दुबे,सौ. मिखिला तळेगावकर, पुजा सिंग, लिला गोहिल. सर्वेश कग्राळकर, सुधीर पवार, उत्कर्षा पाटील, चंद्रकांत जाधव, एकनाथ मोरे, सचिन कदम जुईली पाटील, प्रतिभा गोखले,भाई भोईर आदींनी भरत पाटील यांच्या संघर्षमय प्रवास आणि भटकंती याविषयी बऱ्याच जणांनी आठवणी उलगडून सांगितला. आपल्या सत्कारदाखल भरत पाटील यांनी भारतीय स्टेट बँकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रथम धन्यवाद देतो. माझ्यातील कला, कौशल्य आज तुम्ही सांगितल्याने खरंच भारावून गेलो. म्हणून बँक व सार्वजनिक जीवनात सेवा करण्याचे मला भाग्य लाभले असल्याचे सूचित केले. याप्रसंगी सौ. शालिनी पाटील यांना सौभाग्याचं लेण देऊन सौ. तळेगावकर यांनी सन्मानित केले. या रंगतदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रिया कांबळे यांनी अतिशय मार्मिक शब्दांत केले. उपस्थिता बद्दल कृतज्ञता व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा