You are currently viewing डॉ.डेनिस नाडार यांचा राज्यस्तरीय कोविड योद्धा पुरस्कार देऊन गौरव !

डॉ.डेनिस नाडार यांचा राज्यस्तरीय कोविड योद्धा पुरस्कार देऊन गौरव !

कणकवली :

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना नागरिकांसह नागरिकांवर उपचार करणारे डॉक्टर मंडळींनीही भीतीने आपली दावाखाने बंद ठेवण्यात धन्यता मानली. मात्र कणकवली शहरातील परबवाडी येथील डॉ. डेनिस नाडार हे शेकडो कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरले आहेत. मागील कोरोना काळापासून आजपर्यंत त्यांनी आपले रुग्णालय बंद न ठेवता रुग्णांची शुश्रूषा सुरू ठेवली असून विशेष म्हणजे रविवारी ही त्यांनी दवाखाना सुरू ठेवत रुग्णांना दिलासा दिला आहे. यांबद्दल डॉ.डेनिस नाडार यांचा राज्यस्तरीय कोविड योद्धा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

कोरोना काळात अनेक डॉक्टर मंडळी रुग्णांकडून संसर्ग होण्याच्या भीतीने दवाखाना बंद करून घरात बसली. कणकवली परबवाडी येथील सुखायु क्लिनिक चालवणारे डॉक्टर डेनिस नाडार यांनी रुग्णसेवा सुरू ठेवली. या काळात कोरोना रुग्ण रुग्णालयातील भीतीदायक वातावरणात मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने व सध्याच्या परिस्थितीत रुग्णालयात बेड व ऑक्सिजन न मिळणे व्हेंटिलेटर उपलब्ध नसणे यामुळे अनेकांचा जीव टांगणीला लागलेला. असे असताना कोरोना लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना चाचणी करण्याचा सल्ला व धीर देणे. याचवेळी काही विघ्नसंतोषी लोकांकडून डॉक्टर पॉझिटिव्ह असल्याच्या अफवा देखील उडवल्या गेल्या. तेव्हा डॉ.नाडार यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून मी व माझे कुटुंब पॉझिटिव्ह नाही. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अशा आशयाचा व्हिडिओ देखील प्रसारित केला होता.

तसेच डॉक्टरना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले, घरी येणाऱ्या लोकांची येजा थांबली, त्यांना अत्यावश्यक सेवा देखील त्या काळात मिळाली नाही त्यांची पत्नी सौ. सुषमा नाडार यांच्या खंबीर साथीने आणि नर्स प्रगती सावंत, मयुरी वाघाटे यांच्या सहकार्याने कुटुंबाचा व स्वतःच्या जीवाचा विचार न करता अहोरात्र सेवा बजावून असंख्य रुग्णांवर उपचार केले.

त्यांच्या या समाजसेवेची दखल घेऊन जनजागृती सेवा समिती मुंबई महाराष्ट्र राज्य व श्री संत शिरोमणी नामदेव शिंपी समाज सांगली महाराष्ट्र राज्य,एन.बी. एस. चॅरिटेबल ट्रस्ट कणकवली आणि शिवभवानी, संतोषी महिला ग्रुप बांधकरवाडी, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड योद्धा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन डॉ. नाडार यांचा सपत्नीक भव्य सत्कार त्यांच्या सुखायु क्लिनिक येथे करण्यात आला.

यावेळी उद्योजक राजू मानकर, प्रा.हरिभाऊ भिसे, सुरेखा भिसे, सुषमा नाडार, विजय चव्हाण, जगन्नाथ पावसकर, रेश्मा वडार, शालन पवार, ज्योती पावसकर, विजया चव्हाण, उर्मिला वर्दम, माधुरी पवार, निकिता सावंत, अनिता देसाई, ममता पवार, रिया गवंडी, सुवर्णा कुलकर्णी, साक्षी खांदारे, शोभा शिंदे, अमिता पारकर, अदिती बुचडे, आशा बुचडे, संगीता बुचडे, सौ. रेडेकर, मयुरी वाघाटे उपस्थित होते. तसेच श्री.गुरुनाथ तिरपणकर साहेब (जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र राज्य), श्री.पुरूषोत्तम तांदळे (अध्यक्ष संत शिरोमणी नामदेव शिंपी समाज महाराष्ट्र राज्य), श्रुती उरणकर (समाजसेविका) यांचे विशेष सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − ten =