You are currently viewing कुसूरच्या कन्येला दापोली कृषी विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी प्रदान

कुसूरच्या कन्येला दापोली कृषी विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी प्रदान

वैभववाडी

कुसूर, टेंबवाडी येथील डॉ संजना सुनिल साळुंखे- पाटील यांनी दापोली येथील डॉ बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे. दापोली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतीच ही पदवी प्रदान करण्यात आली.

वैभववाडी तालुक्यातील कुसूर गावातील टेंबवाडी यथे संजना राहत असून तीचे वडील श्री सुनिल साळुंखे पाटील हे गावातील पोस्टात पोस्टमास्तर म्हणून काम करतात. मध्यमवर्गीय कुटूंबात जन्माला आलेल्या संजनाने आपले बारावी पर्यंतचे शिक्षण वैभववाडी तालुक्यातच पूर्ण केले. पुढील उच्च शिक्षण तीने दापोली येथील विद्यापीठात पूर्ण केले. संजनाने माती आणि पाणी संवर्धन अभियांत्रिकी विषयात डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे. नुकताच दापोली विद्यापिठात पदवी प्रदान कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी दुरदृष्य प्रणालीद्वारे महाराष्ट्राचे कृषीमंत्री दादाजी भुसे सहभागी झाले होते. तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषद उपनिर्देशक डॉ. आर. सी. अग्रवाल, कुलगुरु डॉ संजय सावंत, कुलसचिव डॉ भरत साळवी आदि उपस्थित होते.
संजना यांनी मिळवलेल्या उत्कृष्ट यशाबद्दल तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + 8 =