You are currently viewing श्री स्वामी समर्थ काव्यवंदना काव्यपुष्प – २८ वे

श्री स्वामी समर्थ काव्यवंदना काव्यपुष्प – २८ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।

__________________________

श्री स्वामी समर्थ काव्यवंदना काव्यपुष्प – २८ वे

__________________________

 

लिहिती राहो माझी लेखणी । नित्य घडावी सेवा हातुनी ।

ही मागणी तव चरणी । सद्गुरू स्वामी समर्था ।। १ ।।

 

श्री दत्तप्रभूंचे प्रिय स्थान । असे गिरनार पर्वत ठिकाण ।

योगी-मुनी ,साधू -संत महान । करिती येथे जप-तप, अनुष्ठान ।।२ ।।

 

या गिरनार पर्वतावर । आले, ब्रम्हांडनायक स्वामी संचारेश्वर। करिती कृपा श्रीगुरूवर। आपल्या भक्तांवर।।३।।

 

जन्मजात जो पांगळा-गणेशपुरी । वास करीतसे गिरिनारी।

ईच्छा प्रबळ त्याच्या अंतरी । व्हावे दर्शन दत्तप्रभूंचे ।।४।।

 

गणेशपुरीचा विश्वास स्वामींवर । प्रार्थना करी तो वरचेवर। तुम्हीच माझे परमेश्वर । घडवावे मज दत्तदर्शन ।।५।।

 

जमलेले दुर्जन-ढोंगी हसती गणेशपुरीवर। म्हणे, नको ठेऊस

विश्वास तू या जोगड्यावर ।या पोटभऱ्या साधुवार । नाही आमुचा विश्वास रे ।। ६ ।।

 

भक्त-गणेशपुरीचा पाहून विश्वास । स्वामी करिती कृपा खास । पुरवी त्याच्या मनीची आस । घडवीती त्यास श्री दर्शन ।।७।।

 

जमलेले दुर्जन वरमले । स्वामींना शरण आले । क्षमा मागते झाले । श्री स्वामींची ।। ८ ।।

 

स्वामीनी त्यांच्यावर कृपा केली । म्हणाले -निंदानालस्ती तुम्ही रे खूप केली । ही वृत्ती पाहिजे सोडली । यात असे रे कल्याण तुमचे ।। ९ ।।

__________________________

करी क्रमशः हे लेखन कवी अरुणदास

___________________________

कवी अरुणदास – अरुण वि. देशपांडे- पुणे.

___________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा