You are currently viewing विधान परिषदेसाठी भाजपची उमेदवारी जाहीर; प्रमोद जठारांना कोकणातून संधी
Oplus_16908288

विधान परिषदेसाठी भाजपची उमेदवारी जाहीर; प्रमोद जठारांना कोकणातून संधी

पाच उमेदवारांची घोषणा; जठारांसह संजय भेंडे, माधवी नाईक, विवेक कोल्हे व प्रज्ञा सातव यांना उमेदवारी

कणकवली:

विधान परिषदेसाठी भाजपने कोकणाला प्रतिनिधित्व देत पाच उमेदवारांची घोषणा केली असून माजी आमदार प्रमोद जठार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाजपने जठार यांच्यासह संजय भेंडे, माधवी नाईक, विवेक कोल्हे आणि प्रज्ञा सातव यांनाही उमेदवारी दिली आहे. कोकणातून जठार यांना संधी दिल्यामुळे राणे समर्थकांसह भाजपच्या निष्ठावंत गोटातून आनंद व्यक्त केला जात आहे.

प्रमोद जठार हे 2009 मध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. 2014 च्या निवडणुकीत त्यांना विद्यमान पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आमदार असताना त्यांनी आनंदवाडी बंदर, वैभववाडी बस स्थानक तसेच इतर अनेक विकासकामांना चालना दिली होती. नाणार येथील रिफायनरी प्रकल्पासाठीही त्यांनी पुढाकार घेतला होता.

आगामी काळात कोकणातील विविध विकास प्रकल्पांना गती देण्याचे उद्दिष्ट असल्याचे जठार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच विधान परिषदेची संधी दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा