You are currently viewing महाराज असते तर

महाराज असते तर

*ज्येष्ठ कवयित्री सौ.कविता किरण वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*महाराज असते तर*

 

राजे या हो परतून

तुमची अत्यंत गरज

तरच समाजा येईल

संस्कृतीची हो समज

 

युवापिठी भरकटली

मोबाईलच्या नादात

पाश्चात्य ह्या संस्कृतीचे

अनुकरण समाजात

 

महाराज असता तर

याच आमच्या काळात

तुमचे नाव घेताच

बळ मिळे आयुष्यात

 

तुमच्याविना समाज

वाटतो विखुरलेला

आत्मसन्मानच जणू

लाचारीने झुकलेला

 

राजे तुम्ही असता तर

जागेल स्फूर्ती मनोमनी

तुमची घेऊनी प्रेरणा

होऊ धन्य याच जीवनी

 

सौ कविता किरण वालावलकर

दावणगिरी कर्नाटक

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 1 =