You are currently viewing उमेदच्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणार : विनोद तावडे

उमेदच्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणार : विनोद तावडे

कुडाळ :

२०११ पासून जिल्ह्यात महिला बचत सक्षमीकरण उमेद मार्फत सुरु केले आहे. परंतु महाराष्ट्र शासनाने १० सप्टेंबरला आदेश काढून उमेद अभियान राबवणाऱ्या कर्मचाऱ्यांना बेदखल केले. याबाबत भाजपचे कार्यकर्ते निलेश तेंडुलकर यांनी भाजपचे केंद्र सचिव विनोद तावडे यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.
यावेळी जिल्हाध्य्क्ष राजन तेली, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, उमेद कर्मचाऱ्यांमधून प्रसाद कांबळी, निलेश वालावलकर , स्वाती रेडकर, हेमंत मेस्त्री , विरेश पवार , ममता रेडकर उपस्थित होते.


याबाबत बोलताना विनोद तावडे यांनी सदर अभियान सुरुच राहणार आहे. जर काही ही अभियान राबवणारी यंत्रणा बदलली तरी आपण जे गेल्या ९ वर्षात काम उभे केले आहात ते वाया जाऊ देणार नसून आपला सहभाग पूर्वीप्रमाणेच या अभियानात कसा ठेवता येईल या बाबत मी स्वतः प्रयत्न करेन असे आश्वासन यावेळी उमेदच्या कर्मचाऱ्यांना दिले. संपूर्ण महाराष्ट्रातील उमेद कर्मऱ्यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी ठामपणे उभी राहणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − eight =