You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रथम प्राचार्य डॉ द गं कोपरकर यांची प्रतिमा त्यांचे कुटुंबीय महाविद्यालयास भेट देणार

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रथम प्राचार्य डॉ द गं कोपरकर यांची प्रतिमा त्यांचे कुटुंबीय महाविद्यालयास भेट देणार

सावंतवाडी

राजेसाहेब श्रीमंत शिवरामराजे भोंसले यांच्याकडे शिक्षण क्षेत्रातील विविध मुख्याध्यापकांनी, पालकांनी अशी मागणी केली होती की, सावंतवाडीमध्ये उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी एखादे महाविद्यालय असावे तेव्हा १९६०साली दक्षिण रत्नागिरी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झाली .राजेसाहेबांनी आपल्या पित्याच्या स्मरणार्थ श्री पंचम खेमराज महाविद्यालयाची स्थापना केली.या महाविद्यालयाच्या प्रथम प्राचार्य पदी डॉ दत्तात्रय गंगाधर कोपरकर यांनी कामकाज पाहिले. सावंतवाडी आणि एकूणच कोकणातील शैक्षणिक विकासाच्या संदर्भात त्यांचा मोलाचा वाटा आहे. दिवंगत माजी प्राचार्य डॉ द गं कोपरकर यांचे कुटुंबीय दिनांक१३/०९/२०२२ रोजी महाविद्यालयास भेट देणार आहेे. याप्रसंगी ते महाविद्यालयास डॉक्टर द गं कोपरकर यांची प्रतिमा भेट देणार आहेत. याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले,चेअरमन राणीसाहेब श्रीमंत शुभदादेवी खेमसावंत भोसले, संस्थेचे विश्वस्त युवराज लखमसावंत खेमसावंत भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे लखमसावंत भोंसले,व संस्थेचे सन्माननीय सदस्य उपस्थित राहणार आहेत.
सदर समारंभ महाविद्यालयाच्या जिमखाना हॉलमध्ये सकाळी १०.०० वाजता होणार आहे तरी महाविद्यालयाच्या आजी- माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे .असे आवाहन प्राचार्य डॉ डी एल भारमल यांनी व दिवंगत माजी प्राचार्य डॉ द गं कोपरकर यांचे नातू अमित कोपरकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − fourteen =