You are currently viewing जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य दीपक पटेकर यांची काव्यरचना

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य दीपक पटेकर यांची काव्यरचना

*सोडून द्यायला हवं*

माणसांच्या गर्दीत माणूस हरवतो
स्वत्व शोधत स्वतःलाच विसरतो
कशाला माणूसपण शोधायचं नवं
नशिबावर सर्व सोडून द्यायला हवं

अस्तित्व कधीच शोधायचं नसतं
अस्तित्व निर्माण करायचं असतं
का आयुष्य शोधात वाया जावं
विश्वासावर सर्व सोडून द्यायला हवं

“मी पणाने” मोठेपण मिळत नाही
“मी पणा” अपमानितच होत राही
का मीपणाला अंतरंगी स्थान द्यावं
प्रेमावरच सर्व सोडून द्यायला हवं

खोटं हसू खूप खळखळाट करते
सुट्ट्या पैशांसारखा आवाज करते
का चिल्लर ते उगा चेहऱ्यावर यावं
मनावरच सर्व सोडून द्यायला हवं

मान अपमान सर्व मनाचेच खेळ
आपुलकीत त्याचा कुठे असे मेळ
का आनंदात विरजन घालून घ्यावं
नात्यांवरच सर्व सोडून द्यायला हवं

©[दिपी]✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × four =