You are currently viewing २१ ऑगस्ट रोजी देशातील पहिल्या तृतीयपंथी शिक्षिका रिया आळवेकर यांची प्रकट मुलाखत

२१ ऑगस्ट रोजी देशातील पहिल्या तृतीयपंथी शिक्षिका रिया आळवेकर यांची प्रकट मुलाखत

कणकवली :

 

कणकवली वागदे येथील गोपुरी आश्रम बहुउउद्देशीय सभागृह पेट्रोल पंपामागे रविवार दि. २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका रिया आळवेकर यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे.

गोपुरी आश्रमाच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमांतर्गत मिळून सऱ्याजणी मासिक पुणे यांच्या तेहतीसाव्या वर्धापनदिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कवयित्री सरिता पवार या संवादक असणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षकपदी कार्यरत असलेल्या रिया आळवेकर यांनी आपल्या नैसर्गिक भावनांची होत असलेली घुसमट फोडत स्वतःची वेगळी ओळख समाजात निर्माण केली आहे. मात्र आजही समाजात अशा अनेक रिया आहेत ज्या आपली मानसिक कोंडी फोडू शकल्या नाहीत. रिया आळवेकर यांचा हा प्रवास अशा अनेक अज्ञात तृतीयपंथीयांना सन्मानाने समाजात जगण्यासाठी बळ देणारा आहे.

माणूसपणाच्या दिशेने एकमेकांसोबत चालण्यासाठी रिया आळवेकर चा जीवनप्रवास नक्कीच दिशादायक ठरणारा आहे. याच उद्देशाने आळवेकर यांची प्रकट मुलाखत वजा मनमोकळ्या गप्पा हा कार्यक्रम मिळून साऱ्याजणी मासिक पुणे, परिवार सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा