वेंगुर्ले भटवाडी येथील सिध्दीविनायक मंगल कार्यालयात शनिवार दि. २१ जून या जागतिक योगदिनाचे औचित्य साधून वेंगुर्ले शहर शिवसेनेतर्फे सकाळी ५.३० ते सकाळी ७ यावेळेत भव्य मोफत योग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पतंजली संस्थेच्या माध्यमातून तज्ज्ञ योग प्रशिक्षकांच्या माध्यमातून मोफत योगाभ्यास वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत. योगातून निरोगी जीवन जगण्याच्या या योगा प्रशिक्षण शिबीरास नागरिकांकडून उत्फुर्त प्रतिसाद लाभलेला आहे. यात ६० वर्षावरील जेष्ठ नागरिकांसह महिला व युवक-युवतींनीही उत्स्फुर्त सहभाग घेतलेला आहे.
जागतिक योग दिनाचे औचित्य साधून दि २१ जून रोजी नेहमी प्रमाणे योगाभ्यासा बरोबरच सर्व सहभागी योग प्रशिक्षणांत सहभागी झालेल्या योग साधकांना तज्ज्ञ योग प्रशिक्षक जे अचूक योग शिकवितात अशा गुरूजनांचा सत्काराचे नियोजन वेंगुर्ले शहर शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे. या जागतिक योग दिनाच्या योगा कार्यक्रमांत शहरातील सर्व नागरीकांनी सहभागी व्हावे. तसेच सत्कार कार्यक्रमांसठी उपस्थित राहून योगदिनाचे महत्व वाढवावे असे आवाहन शिवसेनेचे वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम यांनी केले आहे.