You are currently viewing ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके हे परखड व्यासंगी विद्यापीठ – गझलकार मसूद पटेल

ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके हे परखड व्यासंगी विद्यापीठ – गझलकार मसूद पटेल

पुणे, वानवडी -(प्रतिनिधी बाबू डिसोजा कुमठेकर)

 

ज्ञानाई फाऊंडेशन आयोजित “विचारांच्या पाणवठयावर “या शीर्षकाखाली निमंत्रित कवी कवयित्रींचे कविसंमेलन आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार मसूद पटेल ,उद्घाटक अशोक कांबळे ,माजी डी.वाय. एस.पी. ,प्रमुख पाहुणे प्रा सूर्यकांत नामगुडे, नटश्रेष्ठ कुमार आहेर, सुधाकर फुले व्याख्याते समता चळवळीचे कांतीलाल गवारे, छगन वाकचौरे सुप्रसिद्ध गायक सूत्रसंचालन रानकवी जगदीप वनशिव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लोककवी सीताराम नरके हे हजर होते.

प्रा हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सुरुवातीला भारताच्या संविधानाचे पूजन करण्यात आले . उद्घाटक अशोक कांबळे माजी अधिकारी इतर मान्यवर यांच्या शुभहस्ते हरी नरके यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .

हार, पुष्पगुच्छ ,अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित केली . सुप्रसिद्ध वृत्त निवेदिका गायिका कवयित्री जयश्री सोनवणे यांनी श्रद्धांजली पर गीत सादर केले.

प्रास्ताविक लोककवी सीताराम नरके यांनी केले.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण नटश्रेष्ठ कुमार आहेर यांनी मी महात्मा फुले बोलतोय एकपात्री प्रयोग सादर करून रसिकांना वेगळी मेजवानी विचार वारस जपत समाजप्रबोधन करणारे आतापर्यंत हजारो प्रयोग त्यांनी सादर केले आहेत.

मा. किशोर टिळेकर ,आनंद गायकवाड, चंद्रकांत जोगदंड ,जनाबापू पुणेकर ,दत्तात्रय केंजळे, रामचंद्र गुरव, पांडुरंग म्हस्के, जयश्री सोनवणे ,अमिनिरूस्सा शहा, दीपिका कटरे ,आशा शिंदे, गिरीश जाधव ,धर्मा शिंदे, शामराव कांबळे ,देविदास झुंरूगे , राहुल भोसले आदि कवी कवयित्री यांनी वैचारिक, मार्मिकपणे मंथन करणारी ,समाज प्रबोधन करत कवितेचे सादरीकरण केले.

अध्यक्षीय भाषणात मसूद पटेल म्हणाले, ज्येष्ठ विचारवंत चळवळीचे शिलेदार प्रा हरी नरके सर यांचे निधन ही विविध परिवर्तन वारी चळवळीला आणि ज्ञान क्षेत्राला हानी पोहचवणारी अत्यंत दुःखद घटना आहे.

धक्कादायक आणि मनाला प्रचंड वेदना देणारी घटना घडली असून एक साहित्यिक अभ्यासक व साक्षेपी संपादक म्हणून त्यांनी महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित अनेक पुस्तके लिहिली हरी नरके यांच्या लेखणीचा हा लहेजा जगावेगळा होताच त्यांनी बुध्दीमत्ता आणि व्यासंग जपला.

पंडित्याचे प्रदर्शन न करता बौध्दिक क्षमता विकसित करण्यासाठी सत्य जगासमोर मांडताना वंचित शोषित समाजाच्या हितासाठी पूरक ठरेल असे विचार मांडत असताना पुणे विद्यापीठला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाव देण्यात प्रा हरी नरके यांचा खारीचा वाटा होता या महान कार्याची महती सर्व जणांना ज्ञात आहे, असे मसूद पटेल म्हणाले.

सूर्य प्रकाश मावळला तरी संधि प्रकाश रेंगाळतो

भेटीचा आस्वाद संपला तरी आठवणींचा सुंगध दरवळतो.

निसर्ग कवी पद्मश्री ना धो महानोर

अजून पुरते सावरलो नाही …

सूर्य चंद्रासारखी दिव्य माणसे सोडूनी जातात सत्याचा उदघोष

हाच कलावंतांचा धर्म असतो

प्रमुख पाहुणे व्याख्याते सुधाकर फुले, कांतीलाल गवारे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच,हरी नरके यांच्या जुन्या आठवणीना उजाळा दिला.

उपस्थित सर्व साहित्यिकांना सन्मान पत्र, पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.

सर्व मान्यवरांचे सत्कार सौ विजयाताई नरके यांनी तर लोककवी सीताराम नरके यांनी सर्वाच्या ऋणात राहू इच्छितो म्हणत कार्यक्रमाचा समारोप केला.

 

————————————————————-

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा