You are currently viewing गणराया हो यावे आता…

गणराया हो यावे आता…

*जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची काव्यरचना*

सकल कलांचा विद्या दाता गणराया हो
यावे आता ..
सुखसमृद्धी ही घेऊनी येता ,रूणझुण पायी
चाळ नाचता …

वक्रतुंड हो सुखदायक हो नमितो तुम्हाला
सारे जन हो …
पीत पितांबर शूर्पकर्ण हो तुंदिल तनु तू
सुखकारी हो…

थयथय नाचत गर्जत गर्जत आनंदाची
धून पसरवत…
चैतन्याचा महामेरू हो यावे यावे छुन
छुन नाचत …

सर्व जगाच्या कल्याणास्तव स्तवन गाऊनी
करीतो आर्जव …
तारून तारावे जगताला सुखी होऊ दे सारा
मानव …

नमितो माथा ठेवूनी चरणी सुमुख सुंदर
चर्या देखणी …
आनंदाचा कंद तुम्ही हो सुखविण्या यावे
सारी धरणी….

आशीष आपुले सदैव असती मानवतेच्या
कल्याणास्तव
गणाधिश हो विद्यादाता सुखदायक व्हा
व्हा आम्हास्तव …

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा