You are currently viewing श्री गणेशा

श्री गणेशा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी निवृत्त पोलीस अधिकारी वासुदेव खोपडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

*श्री गणेशा*

हे गणाधिपती देवा
गणेशा तू गणराज
भारतभुचा पामर
मागतो मागणे आज !!

कर्णी तुझिया सांगतो
मनी वाटते रे लाज
ह्या भ्रष्टांचा श्रीगणेशा
पुरा उतरवा हो माज !!

ह्याच व्यापाऱयांनी देवा
लाज शरम विकली
एक वार तिरंगा पट्टी
ह्यांनी बेभाव विकली !!

अति उन्मत्त जाहले
शासन,शासक,दलाल
दीन दुबळी जनता
देवा झाली रे हलाल !!

काय सांगू बाप्पा तुज
बळीराज्याची ती व्यथा
असह्य वेदनापाई
गळा लावतो रे काथा !!

असुरक्षित नार येथे
जन्मले बहू असुर
रक्षक झाले भक्षक
आन नेते ताणासुर !!

सुखकर्ता दुखहर्ता
तूच बुद्धीची देवता
जगात माझ्या नांदू दे
शांती अन एकात्मता !!

वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक(से.नि.)
अकोला 9923488556

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − six =