You are currently viewing ।। गण गण गणात बोते ।। जय गजानन ।।

।। गण गण गणात बोते ।। जय गजानन ।।

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरुण वि. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

।।गण गण गणात बोते ।। जय गजानन ।।

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प-४५ वे

अध्याय- ८ वा, कविता – २री

————————————-

वंदन श्री गणेशाला । वंदन विद्यादेवी सरस्वतीला । वंदन

श्री सद्गुरूला । वंदन सर्वांना कवी अरुणदासाचे ।।१ ।।

 

अब्रू धोक्यात येता । पाटील झाला भयभीत चित्ता ।

करी प्रार्थना जोडूनी हाता । स्वामी गजानना ।। २ ।।

 

स्वामी पाटलास जवळ घेती । त्याला धीर देती । म्हणे-

कर्त्या पुरुषावरती । संकटे येती -जाती ।। ३ ।।

 

देशमुख-पाटील तुम्ही । चांगल्याची नसे हमी । दुष्ट बुद्धीला

आणता कामी । चालूच तुमचे हे वैर रे ।। ४ ।।

 

स्वार्थी पक्ष देशमुखाचा । तुझा पक्ष सत्याचा । विचार तुझ्या रक्षणाचा । असे आमच्या मनी सत्या पोटी ।। ५ ।।

 

शब्द समर्थांचे । कधी ना खोटे व्हायचे । पाटलावरी संकट बेदी पडण्याचे । निवारिले स्वामी गजाननाने ।। ६ ।।

 

खंडू पाटील संतोषला । गजानन चरणी लीन झाला ।

स्वामी कृपेचा लाभ झाला । संकट ते सारे टळले ।। ७ ।।

*****

क्रमशः लेखन करी कवी अरुणदास

—————————————–

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प-४५ वे

अध्याय- ८ वा, कविता – २री

-अरुण वि.देशपांडे-पुणे

——————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा