You are currently viewing भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत करोना नियमांचे उल्लंघन; गुन्हे दाखल

भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत करोना नियमांचे उल्लंघन; गुन्हे दाखल

भारतीय जनता पक्षाने काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेवर मुंबईत विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विनापरवानगी आणि करोना नियमांचे उल्लंघन करून या यात्रेचे आयोजन केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे नोंदविले आहेत.

मुंबईत गुरुवारी विविध ठिकाणी गेलेल्या या यात्रेत मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते सामील झाले होते. याप्रकरणी विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर, गोवंडी आदी सात पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. सरकारी आदेशाचे उल्लंघन करणे, संसर्गजन्य आजार पसरविण्याची कृती करणे आणि आपत्तीव्यवस्थापन कायद्यांतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा