You are currently viewing कुडाळ तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण जाहिर 

कुडाळ तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण जाहिर 

कुडाळ
कुडाळ तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण जाहिर झाले या आरक्षणात अनेकांचे पत्ते गुल झाले तर काही जण बचावले आहेत. दरम्यान अलिकडेच झालेल्या ९ ग्रामपंंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण जाहिर करण्यात आले हे आरक्षण तहसिलदार अमोल फाटक यांनी जाहीर केले यावेळी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

कुडाळ तालुक्यातील ६८ ग्रामपंंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणात अनुसूचित जाती महिला (३), अनुसूचित जाती सर्वसाधारण (२), अनुसूचित जमाती सर्वसाधारण (१), नागरीकांचा मागास प्रवर्ग महीला (९), नागरीकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण (९), सर्वसाधारण महिला (२२), सर्वसाधारण (२२) असे असून ग्रामपंचायत निहाय सरपंच पदांचे आरक्षण

(अनुसूचित जाती महीला) मांडकुली, पांग्रड, कालेली,

(अनुसुचित जाती सर्वसाधारण) पोखरण-कुसबे, आंब्रड,

(अनुसूचित जमाती सर्वसाधारण) ओरोस बु.

(नागरीकांचा मागास प्रवर्ग महीला) पणदूर, तेंडोली, भरणी, नारूर क.नारूर, वाडोस, झाराप, कडावल, मुळदे, नेरूर-देऊळवाडा,

(नागरीकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण) गावराई, बांव, आंदुर्ले, चेंदवण, कुंदे, हुमरस, कुपवडे, अणाव, आंबडपाल,

(सर्वसाधारण महीला) केरवडे क. नारूर, डिगस, परबवाडा पाट, वेताळबांबर्डे, घोटगे, घावनळे, सोनवडे त. कळसुली, हिर्लोक, वाडीवरवडे, नेरूर क.नारूर, केरवडे त. माणगांव, आवळेगांव, कवठी, साळगांव, सोनवडे त. हवेली, शिवापूर, बिबवणे, नानेली, माणगांव, तुळसुली क. नारूर, पावशी, पुळास,

(सर्वसाधारण) रानबांबुळी, कसाल, गिरगांव-कुसगांव, पडवे, सरंबळ, निरूखे, भडगांव बु., वालावल, आकेरी, जांभवडे, निवजे, वर्दे, बांबुळी, तुळसुली त.माणगांव, वसोली, तेर्सेबांबर्डे, त. माणगांव, माडयाचीवाडी, गोवेरी, हुमरमळा, अणाव, गोठोस, हुमरमळा वालावल, पिंगुळी अश्या ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत.

कुडाळ तालुक्यातील ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहिर झाले आहे. अलिकडेच पार पडलेल्या ग्रा. प. च्या ९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण जाहिर झाले. यात पोखरण-कुसबे अनुसूचित जाती तर गोठोस नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत.
कुडाळ तालुक्यात दि. १५ जानेवारीला ९ ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या. त्यामुळे या ९ ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण आज जाहीर झाले. ते पुढील प्रमाणे गोवेरी, माड्याचीवाडी, आकेरी, गिरगाव-कुसगाव, कुपवडे, वसोली, गोठोस या ७ ग्रामपंचायतीमध्ये सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित झाल्या आहेत तर पोखरण-कुसबे अनुसूचित जाती आणि वाडोस नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षीत झाले आहे. हि आरक्षण सोडत बालक प्रेम ओंबासे व सानिका पावसकर यांच्या हस्ते काढण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − 11 =