You are currently viewing आज तिरंग्यात पावन झालो मी

आज तिरंग्यात पावन झालो मी

शपथ घेता देशसेवेची
सळसळते रक्त अंगात.
अभिमानाने फुलते छाती
जागते देशप्रेम रक्तात.

रक्षण करण्या देशाचे
सीमेवर उभे वीर बर्फात.
नसे झोप ना भीती उरी
जिंकण्याचे स्वप्न डोळ्यांत.

आक्रमण परतूनी लावी,
तुटूनी पडे शत्रूवर जोशात.
हिम्मत करता लढण्याची
भरे भीती शत्रूच्या उरात.

बलिदान देता देशासाठी
लपेटती आज तिरंग्यात.
पावन झालो मी सैनिक
अभिमान अमर होण्यात.

(दिपी)
©दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा