You are currently viewing आतुर मन

आतुर मन

झोप लागली रातीची,
स्वप्न पडलं सुंदर.
स्वप्न सत्यात उतराया,
माझा साजन येणार.

अंग अंग शहारलं,
काटे बोचले तनाला.
हास्य गालावर फुललं,
झाला आनंद मनाला.

बोट ओठांवर फिरलं,
मन आनंदे डोललं.
उभ्या शेतात जणू,
वारं सैरावैरा धावलं.

जीव कासावीस झाला,
डोळे वाटेकडे धावले.
तुझ्या येण्याच्या खुशीत,
मस्तीचे डोहाळे लागले.

तू जवळी येशील,
मला कवेत घेशील.
स्पर्श तुझा अंगा माझ्या,
पुन्हा पुन्हा देशील.

मन पोचले तुझ्यापाशी,
वाट पहाते दारावर.
मन मन फिरून सांगते,
माझा साजन येणार…
माझा साजन येणार….!!

(दिपी)✒️
दीपक पटेकर
सिंधुदुर्ग
८४४६७४३१९६.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + 14 =