You are currently viewing || देवाघरचा पाऊस ||

|| देवाघरचा पाऊस ||

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.अनघा कुळकर्णी लिखित अप्रतिम लेख*

*🌧️🌧️ || देवाघरचा पाऊस ||🌧️🌧️*
Welcome RainGod!!🌦️🌦️🌧️

🌦️आलास,ये पावसा ये.या धरतीवर तुझे स्वागत आहे. तशी तुझ्या येण्याची चाहूल लागली होती. काळे मेघ एकत्र येऊन गर्जू लागले.ओला थंड वारा सुटला. मोर थुई थुई नाचू लागले.
तु आलास, मृदगंधचा दरवळ पसरवलास.बघ,पंख पसरवून चिमण्याहि पाणी उडवताहेत. मातीचा ओला स्पर्श प्रत्येकाची काया सुखावून जातो.
🌦️पावसा, अरे तुझ्याशी खूप बोलायचंय. लहानपणापासून आम्ही तुझं गाणं “ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा” किंवा “ये ग ये ग सरी माझे मडके भरी” असे म्हणतच मोठे झालो. अरे, देव ढगात पलीकडे असतो ही आमची कल्पना आणि तू ढगातून येतोस म्हणजे देवा घरूनच येतोस हो ना? आवडतं आम्हाला पावसात चिंब भिजणं.तु बरसत राहिलास की आम्ही ओंजळ धरतो तू बरसत असताना पाण्याने आमची ओंजळ भरते.
🌦️अरे पण याच दिवसात गतवर्षी आम्ही विनंती म्हणा याचना म्हणा किंवा मागणं मागितलं”देवा पाऊस पण असा पडू दे त्याचा प्रत्येक थेंब तुझ्या चमत्काराचा सॅनिटायझर होऊन बरसू दे व ही महामारी नष्ट होऊ दे” पण कसले काय,मेघांचे मंडल सोडून आकाशामध्ये फिरणाऱ्या विद्युल्लतेचा मार्ग जसा मानवाच्या लक्षात येत नाही अगदी तसेच प्रभुच्या मनाचा ठाव काही लागत नाही. बघ, इथले वातावरण किती भयावह व उदास आहे.मान्य आहे आम्ही चुकलो पण ही एवढी क्रुर शिक्षा?
🌦️अरे कित्येक परिवारातील आप्त स्वकीयांना हिरावून नेलंस,कुणाची लेकरे पोरकी झाली तर कुणाचे आईवडील पोरके झाले.दु:खाचे मनोरे उभे आहेत, रस्ते निर्मनुष्य आहेत.या महामारीने स्वप्नांचे मळे जाळून टाकले आहेत.मान्य आहे आम्हाला खूप चुकलो आम्ही.
🌦️पावसा, तुझ्यामुळे जी बीजं अंकुरले व त्याचे वृक्ष झाले त्यांनाच नष्ट केलं रे. तू दिलेला प्रत्येक थेंब इतका स्वच्छ, शुद्ध पण त्या पाण्याचाही प्लास्टिक कचरा वापरून आम्ही मार्ग अडवला. कचराच काय वाटेल ते टाकून तू दिलेलं निर्मळ पाणी दूषित केलं पण आता मोठ्या मनानं क्षमा करावी.
🌦️अरे,तुझ्यावर पूर्णपणे अवलंबून असलेलो आम्ही आता तुझ्यामुळे मिळालेली संपत्ती जतन करु,रक्षण करु ही हमी तुला देतो.
🌦️बरं झालं तु आलास,वाटलं बरसण्याची वेळ झाली तर आभाळहि फितुर झालं की काय? अरे, तुझ्या प्रत्येक थेंबाची धरतीला तहान आहे, तू आलास की धरती टवटवीत दिसते इथल्या बागा जसे फुलवतोस तशाच पोरके झालेल्या लेकरांच्या मनाच्या बागा पण प्रफुल्लित होऊ दे.तसं सावरलंय सर्वांनी पण अजून थोडा काळ सरायला हवा.तुझ्या आगमनाने मनाला उभारी येऊ दे. मागे राहिलेल्यांना जगण्याचे बळ मिळू दे. तुझ्यामुळे अनुभवतो आम्ही बीजाचं अंकुरण्यासाठी रुजणं आणी सृष्टीच्या सृजनाचे भेटीचे दर्शन.
🌦️परतीचा जाशील तेंव्हा वाटेल की खूपसं सांगायचं होतं.
तु खूप दिलंस तरी आणखी मागायचं होतं.⛈️🌦️☁️

सौ.अनघा कुळकर्णी.पुणे.
९३२३४९१११३🙏🏻

 

 

*संवाद मिडिया*

🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*

*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨‍🎓👩‍🎓

🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇

◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*

https://sanwadmedia.com/99360/
◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷

◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*

*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*

*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰

*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*

🪪👩🏻‍🎓🧑🏻‍🎓
*स्कॉलरशिप*

*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*

*आताच भेट द्या –👇🏻*

*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*

*http://www.mitm.ac.in/*

*संपर्क -*📞
*02362-299195*

*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*

🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰

*FC Code-3440*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99360/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा