You are currently viewing चंद्रास

चंद्रास

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या जेष्ठ कवयित्री नंदिनी चांदवले (न्यू जर्सी) लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*चंद्रास*

 

आकाशात तुझ्या शुभ्र शीतल

प्रकाशाने झगमगणारा पृथ्वीचा

चंद्र तू……

रामचंद्रानीही हट्ट केला होता तुझ्यासाठी

तुझ्या सौंदर्याने वेडं केलस जगाला…..

या वेडापायी अनेकदा चांद्रयान

तुला भेटायलाही आलं

कधी भेट झाली कधी अडथळे आले……पण

माघार घेतली नाही आम्ही

अखेर 23 ऑगस्ट रोजी तुला

चांद्रयान-3 भेटले

पृथ्वीवर तुझे फोटो आले

तुझं खर खुरं रुप समजलं

तिथे काय आहे,तूकसा राहतोस,

कसा जगतोस, तुझ्याजवळ कोण ?

की एकटाच फिरतोस आकाशात !

समजेलच हळूहळू सारं …..

काही झालंतरी पृथ्वीवरच्या बहिणींचं तुझ्यावरच प्रेम

तेच रहाणार,भाऊबीजेला त्यां ओवाळतच रहाणार

तू… मुलांचा मामा म्हणून आकाशात दिमाखात मिरवतच राहणार …..

मिरवतच राहणार !

 

नंदिनी चांदवले.

New Jersey

प्रतिक्रिया व्यक्त करा