You are currently viewing गानसम्राज्ञी

गानसम्राज्ञी

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या कवयित्री श्रीम.आदिती मसुरकर यांची काव्यरचना

अनमोल देशाचे रत्न
भारतभूची आहे शान
साऱ्या विश्वात त्यांनी
उंचावली देशाची मान

साऱ्या विश्वात दुमदुमला
गान कोकीळेचा मधुर सूर
कानी गुंजणारा तो स्वर
आज सर्वांपासून गेला दूर

दुःख . आनंद .विरह भाव
जीवंत केले आवाजातून
गान सम्राज्ञी बनून तिने
मंत्रमुग्ध केले गाण्यातून

सप्तसुरांची कोमल गंगा
वाहत होती कंठातून
अर्पूया दिदींना श्रद्धांजली
नयन भरल्या अश्रूंतून

*✒️© सौ आदिती मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × two =