You are currently viewing मी(रा)?राधा?

मी(रा)?राधा?

सावंतवाडी ही नररत्नांची खाण, अशाच सुंदरवाडीतील एक कवयित्री सौ.प्रज्ञा आनंद आपटे (रजिता बांदेकर) यांची कृष्णभक्त मीरा आणि राधा या दोघींचे कृष्णाशी असलेलं नातं अतिशय उत्तमरीत्या मांडलंय आपल्या काव्यरचनेतून…

तू तर फक्त कृष्णसखा
पण मी कोण? राधा? की मीरा?
दोघी तुझ्याच भक्त
पण फरक इतकाच फक्त
राधेला प्रेमळ सहवास
मीरेला फक्त विरह
राधेसोबत तू रासलीलेत मग्न
मीरा तुझ्या गुणगानात मग्न
राधेच्या डोळ्यात तू
तर मिरेच्या मनमंदिरात तू
राधेचे डोके तुझ्या खांद्यावर
तर मीरेचे तुझ्या चरणकमलावर
राधेची लाडिक तक्रार तुला प्यारी
मीरा तुझ्या तक्रारींचीही भुकेली
राधेला ओढ तुझ्या प्रेमाची
मिरेला आस तुझ्या सेवेची
आता तूच सांग…मी कोण?
मी(रा)? राधा?

सौ.प्रज्ञा आनंद आपटे
( आजगाव)

प्रतिक्रिया व्यक्त करा

four − 3 =