You are currently viewing डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.

मुंबई :

दादरच्या इंदूमिलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज १८ सप्टेंबर दुपारी तीन वाजता पार पडणार होत. निमंत्रणावरून वाद विवाद सुरू होता. विरोधकांना निमंत्रण देण्यात आले नव्हते.

भारत रत्न डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाच्या सुधारित संरचनेनंतर पादपीठ आणि पुतळ्याच्या पायाभरणीचा हा कार्यक्रम आज होणार होता. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित राहणार होते. मात्र आजआनंदराज आंबेडकर यांनाही इंदू मिलमधील पायाभरणी सोहळ्याचं आमंत्रण उशिराने पाठवण्यात आलं होत.
स्मारकाच्या निधीतही ४०० कोटींची वाढ केली असून आता एकून ११०० कोटी निधी करण्यात आला आहे. तसेच या स्मारकाच्या कामाची संपूर्ण जबाबदारी ही एमएमआरडीएकडे देण्यात आली आहे. त्यासोबतच स्मारकात एक मोठं ग्रंथालयही असणार आहे. विशेष म्हणजे येथे चवदार तळ्याची प्रतिकृतीही तयार करण्यात येणार आहे. हे स्मारक दोन वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिल येथील स्मारकामधील पुतळ्याची उंची ३५० फूट एवढी असणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × four =