You are currently viewing संकटमोचक आमदार..

संकटमोचक आमदार..

कणकवली :

 

कोरोनाचे संकट जिल्ह्यात वाढतच आहे. सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर राहिला होता. जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोनाच्या संसर्गामुळे चिंतेचे वातावरण असून गावपातळीवर कोरोना रुग्ण जास्त वाढत असल्याने अनेक गावांमधे कोविड सेंटर सुरू करण्यात येत आहेत. परंतु कोविड सेंटर सुरू करताना सरपंचांवर महत्वाची जबाबदारी येत असताना सरकारकडून सरपंचांना कोणतीही सुरक्षा, अथवा विमा दिलेला नसल्याने सरपंच कोरोनाच्या विषयी काम करताना घाबरत आहेत. देवगड कणकवलीचे आमदार नितेश राणे हे सत्ता असो वा नसो नेहमीच आपल्या मतदारसंघातील सोयीसुविधांसाठी प्रयत्नशील असतात.

मतदारसंघातील जनतेने आपल्याला निवडून दिले आहे, त्यामुळे मतदारसंघाची जबाबदारी आपली आहे. या उदात्त भावनेतून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतानाच मतदारसंघातील सर्व १६९ सरपंचांचा आपण विमा उतरविणार असल्याची ग्वाही आमदार नितेश राणे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून दिली आहे.

याबद्दल माहिती देताना आमदार राणे यांनी सांगितले की, विमा तीन लाख रुपयांचा असून तीन लाख रुपये पुढील तीन चार महिन्यात जरी खर्च झाले तरी त्याला तीन लाख रुपये रिस्टोअर म्हणून दिले जातील. त्याच बरोबर बिल वाढले तरी त्यासाठी ७५०००/- रुपयांचा चोलामंडल कंपनीचा विमा एक वर्षांसाठी देणार. या विम्यामध्ये इतर आजारही सामील आहेत. सरपंचांवर गावाची महत्वाची जबाबदारी असल्याने आणि आपली जबाबदारी पार पाडताना काहींना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. त्यामुळे आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी सरपंचांना विमा कवच मिळणे आवश्यक होते. राज्य शासनाने याबाबत कोणतीही कारवाई केली नसल्याने मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून आपण ही जबाबदारी घेत आहे असेही ते म्हणाले.

देवगड कणकवली मतदारसंघातील सरपंचांना विमा कवच देताना आपण पक्षभेद बाजूला ठेऊन सर्व १६९ सरपंचांचा विमा उतरविणार असल्याची आमदार नितेश राणे यांनी ग्वाही दिली. तसेच पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लस देणे आवश्यक होते परंतु सरकारने पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देत नसल्याने नाराजी व्यक्त करत आम्ही पत्रकारांना लस देण्यासाठी पुढे आलो परंतु सरकारने राजकारण करत विरोध केल्याचे सांगितले.

आमदार नितेश राणे हे जिल्ह्यातील कार्यतत्पर आमदार म्हणून ओळखले जातात, आपल्या मतदारसंघातील प्रत्येक कामात ते अग्रेसर असतात. देवगड आणि वैभववाडी हे विकासापासून दुर्लक्षित असलेले तालुके आमदार नितेश राणे यांच्या व्हिजन मुळे पर्यटन विकासाच्या दिशेने वाटचाल करताहेत…

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 4 =